burns sakal
पुणे

पंचाऐंशी टक्के भाजलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश

स्वरांश देवकर हा अडीच वर्षाचा चिमुकला अंगावर गरम पाणी सांडल्याने पंचाऐंशी टक्के भाजला

कृष्णकांत कोबल

हडपसर : दीड महिना केलेल्या शर्थीच्या उपचाराने पंचाऐंशी टक्के भाजलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला जीवदान मिळवून देण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. नोबल हॉस्पिटलमधील विशेष बर्न्स युनिटमध्ये डॉ. अभिषेक घोष आणि डॉ. एस भंडारी यांच्या पथकाने तेरा शस्त्रक्रिया करून हे यश मिळवले आहे.

स्वरांश देवकर हा अडीच वर्षाचा चिमुकला अंगावर गरम पाणी सांडल्याने पंचाऐंशी टक्के भाजला होता. त्याला सुमारे दीड महिन्यापूर्वी येथील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात भाजल्याने तो वाचेल, असे वाटत नव्हते. मात्र, नोबल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अभिषेक घोष, डॉ. एस. भंडारी, भुलतज्ञ आणि त्यांचे पथक, परिचारीका यांच्या टिमने विचारविनिमय करून चिमुकल्या स्वरांशवर सर्वोत्तम प्रोटोकॉल प्रमाणे उपचार देण्याचे ठरवून डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले.

रुग्णाचे रोगनिदान खूपच खराब होते आणि जगण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे दिसत होते. बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करून वैद्यकीय आणि सर्जिकल थेरपीच्या स्वरूपात प्रगत उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीला बालक उपचाराला प्रतिसाद देत होता परंतु, भाजण्याचे प्रमाण जास्त असल्याने बालक सेप्सिसमध्ये गेला आणि त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. मात्र, डॉक्टरांनी कसोशीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. सुदैवाने हळूहळू बाळाची तब्येत सुधारून तो बरा होऊ लागला.

दरम्यान, या चिमुकल्यावर बर्न डीब्राईडमेंट, बर्न एक्सिजन आणि स्किन ग्राफ्टिंगसह 13 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती आता चांगली आहे. पुढील काही दिवसांत त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. घोष यांनी सांगितले.

"बर्न्सची इतकी उच्च टक्केवारी असलेल्या रूग्णाचे जगणे जगभरातील सर्वोत्कृष्ट बर्न युनिटमध्येही अत्यंत दुर्मिळ असते. अशा बर्न्सवर फक्त सर्व समावेशक बर्न्स सेंटरमध्ये उपचार केले जाऊ शकतात. नोबल हॉस्पिटलमध्ये एक विशेष बर्न्स युनिट आणि अनुभवी डॉक्टर आहेत. बर्न्स रुग्णांना जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार आम्ही स्वतंत्र व्यवस्थेद्वारे येथे उपलब्ध करून दिले आहेत.'

- डॉ. दिलीप माने, व्यवस्थापकीय संचालक, नोबल हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT