पुणे

काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी देईनात प्रतिसाद

CD

काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादींचा ‘एसआयआर’कडे पाठ
बीएलए नियुक्तीत भाजप आघाडीवर; दोन्ही शिवसेना, माकपचा प्रतिसाद

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : व्होटचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम हाती घेतली आहे. देशातील १६ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ७२३ केंद्रांवर राजकीय पक्षांचे बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

या मोहिमेत बीएलए नियुक्तीत भाजप आघाडीवर असून, सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार याद्यांची पडताळणी २००२ मधील मतदार याद्यांशी केली जात आहे. हे काम जिल्ह्यातील ३ हजार ७२३ बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचाही सहभाग असावा, यासाठी निवडणूक आयोगाने बीएलओंसोबत पक्षांचे बीएलए नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे.
राजकीय पक्षांसाठी ही प्रक्रिया ऐच्छिक असली तरी भविष्यात मतचोरीसारखे आरोप टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पक्षांचा सहभाग अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० एप्रिल रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर भाजप, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकप, बसप, आम आदमी पार्टी व एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांना दोनवेळा पत्र पाठविण्यात आले.
मात्र भाजप, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि माकप या चार पक्षांनीच बीएलए नियुक्त केले आहेत. उर्वरित पक्षांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

कोणाचे किती बीएलए?
एकूण केंद्रे : ३,७२३
भाजप : १,३१८
शिवसेना : ६५०
शिवसेना (उबाठा) : २१
माकप : २२
--
मतदार याद्यांचे ८१.३० टक्के मॅपिंग
सोलापूर जिल्ह्यातील ३९ लाख ४९ हजार मतदारांपैकी ३२ लाख ११ हजार मतदारांचे (८१.३० टक्के) मॅपिंग पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उत्तर सोलापूरमध्ये सर्वांत कमी ६८ टक्के, सोलापूर दक्षिणमध्ये ७० टक्के आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ७७ टक्के काम झाले आहे. करमाळा ८४ टक्के, माढा ८६ टक्के, बार्शी ८८ टक्के, मोहोळ ८५ टक्के, अक्कलकोट ८३ टक्के, पंढरपूर ८४ टक्के, सांगोला ८६ टक्के आणि माळशिरस ८५ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

IND vs SL: श्रीलंकन खेळाडूशी धडक, केएल राहुलचा कॉलचा गोंधळ अन् यशस्वी जैस्वाल रनआऊट! गॉलमध्ये ड्रामा...पाहा Video

SCROLL FOR NEXT