Baramati taluka co-operative buying and selling team sakal
पुणे

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होणार

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला.

मिलिंद संगई

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला.

बारामती - येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणूकीचा मार्ग आज मोकळा झाला. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे.

मात्र या बाबतची अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर केली जाणार आहे, सोमवारी अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानून 17 उमेदवारांनी 17 जागांसाठी अर्ज दाखल केल्यामुळे परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

यंदा बारामती तालुका खरेदी विक्री संघावर या पूर्वी काम केलेले पाच तर प्रथच संघावर काम करणारे बारा नवीन चेहरे अजित पवार यांनी दिले आहेत. नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचेच काम पवार यांनी या निमित्ताने केले असल्याची माहिती बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.

यंदा संचालक मंडळात सभासद संस्था प्रतिनिधींमध्ये विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी), बाबुराव तात्याबा चव्हाण (घाडगेवाडी), दत्तात्रय रामभाऊ आवाळे (सावळ), विजय रामचंद्र शिंदे (बांदलवाडी), रवींद्र महादेवराव माने (खांडज), शिवाजी जगदेवराव टेंगले (म्हसोबावाडी), संभाजी दादासाहेब जगताप (पणदरे), उदयसिंह पंढरीनाथ धुमाळ (धुमाळवाडी), नितीन रामचंद्र देवकाते (पिंपळी), लक्ष्मण वसंत जगताप (जळगाव सुपे) यांना, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब चंद्रराव मोरे (अंजनगाव) यांना, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून ज्ञानदेव बापूराव नाळे (डोर्लेवाडी) यांना, महिला प्रतिनिधी म्हणून सोनाली दादासो जायपत्रे (मुढाळे) व लताबाई अंकुश जगताप (सायंबाचीवाडी) यांना भटक्या जाती विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रतिनिधी म्हणून रमेश शिवाजी देवकाते (मेखळी) तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधी म्हणून भारत गुलाबराव ढवाण (बारामती) व अशोक लालासाहेब जगताप (पणदरे) यांना संधी देण्यात आली आहे.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 1963 मध्ये झाली. या संस्थेची उलाढाल आज 117 कोटी रुपये असून संस्थेच्या विविध दुकानांच्या 22 शाखा कार्यरत आहेत. औषधे, बी बियाणे, खते, रासायनिक औषधांचा व्यापार संघाच्या वतीने केला जातो. संघामध्ये 126 कर्मचारी कार्यरत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वाची आहे. बारामती तालुक्यातील एक प्रमुख सहकारी संस्था म्हणून खरेदी विक्री संघाकडे पाहिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! १९६५ ते २०२४ पर्यंतचे गुंठेवारीचे व्यवहार होणार कायदेशीर; प्रॉपर्टी कार्ड अन्‌ गृहकर्जही मिळणार, २६ जानेवारीला मालकीपत्र देण्याचे नियोजन

Maharashtra Soybean Scam : सोयाबीन खरेदीतील ‘लूट’ सभागृहात पोहोचली; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप; गुणवत्तेचे सोयाबीनही नाकारले!

आजचे राशिभविष्य - 13 डिसेंबर 2025

सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षकांना धास्ती! शिक्षकांना नोकरी वाचविण्यासाठी ६ ‘टीईटी’ देण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच

हौस ऑफ बांबू - यावे अमुच्या ग्रंथांच्या गावा..!

SCROLL FOR NEXT