Celebration
Celebration 
पुणे

Election Results : गुलालाची उधळण अन्‌ डीजेवर ठेका

सकाळवृत्तसेवा

भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी, बापट यांचा जयघोष
पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर व गिरीश बापट यांचा विजय झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित खासदारांसह आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.

दारुण पराभव झाल्याने काँग्रेस भवनात शुकशुकाट असताना भाजपच्या कार्यालयात मात्र आनंदोत्सवाचे चित्र पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, मिठाई वाटून आणि फटाके वाजवत आनंद साजरा केला.

तसेच, या वेळी अनेकांनी डीजेवर ठेका धरला. मतमोजणी केंद्रावरून घरी आले असता, बापट दीडला शहर कार्यालयाला दाखल झाले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे गुलाल उधळून स्वागत गेले. बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते कार्यालयात आले होते. 

‘भाजपचा विजय असो’, ‘गिरीश बापट झिंदाबाद’, ‘नरेंद्र मोदी झिंदाबाद’, ‘राज तिलक की करो तयारी, आ रहे हे भगवाधारी’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. तर ‘माझ्या रे नादाला लागू नको’, ‘दुश्‍मन की देखो, कैसे वाट लावली’, ‘आ देखे जरा किसमे कितना हे दम’, ‘मैं हू डॉन’ या गाण्यांवर नाचत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, दिलीप कांबळे आदी पक्षांच्या विजयात सहभागी झाले होते.   

बापट यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच कार्यालयाला फुलांनी सजविण्यात आले होते. बापट यांना शुभेच्छा देणारे बॅनर बुधवारी रात्रीच कार्यालयाबाहेर लावण्यात आले होते. त्यात दुपारनंतर भर पडली. भाजपचा ध्वज व भगवे फेटे बांधलेल्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून गटागटाने शहरातून रॅली काढली. शहराच्या काही भागांत चौका-चौकात स्पीकर लावून आनंद व्यक्त करण्यात आला. 

मोदींनी केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांनी भाजपवर एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्‍वास दाखवला आहे. काँग्रेसने उगाच ईव्हीएम हॅक केल्याचा कांगावा करू नये, अशी भावना या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT