पुणे

सभासदांचा विश्वास आणि कारखान्याचा विकास हेच आमचे बळ – आ. मोनिका राजळे

CD

निवडणुकीत यश निश्चित
मोनिका राजळे ः शेतकरी मंडळाची प्रचार सभा

कोरडगाव,ता. २४ ः सभासदांचे हित आणि कारखान्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने विकासाभिमुख व पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत यश निश्चित असून कार्यकर्त्यांनी सभासदांच्या भेटीगाठी घेऊन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करावी, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

आदिनाथनगर येथे आदिनाथ शेतकरी मंडळाच्या वतीने आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मुखेकर हे होते.

राजळे म्हणाल्या की, मागील काही वर्षांपासून कारखान्याचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यासाठी संचालक मंडळाने अहोरात्र प्रयत्न केले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबविणे आणि शेतकऱ्यांसह कारखान्याचा विकास साधणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. स्वर्गीय दादा पाटील राजळे आणि माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा कारखाना स्पर्धेच्या युगातही इतर कारखान्यांच्या बरोबरीने यशस्वीपणे कार्यरत आहे. कारखान्याच्या विकासकामांची जाणीव सभासदांना असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक नारायण काकडे, बाबासाहेब किलबुले, मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाष बर्डे, मार्केट कमिटी संचालक मधुकर देशमुख, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बंडू पाटील पठाडे, भाजप तालुकाध्यक्ष दिगंबर भवार, युवराज फुंदे, सुधाकर भवार, मुकुंद आंधळे, बळीराम काकडे, रवींद्र गाडे, स्वराज बोंद्रे, अशोक गोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT