जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती sakal
पुणे

जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीची संचालक मंडळाची मुदत मागील वर्षी ३ ऑक्टोबर २० रोजी संपली होती मात्र कोरोनामुळे सुमारे एक वर्ष संचालक मंडळास मुदत वाढ मिळाली आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूक दोन टप्प्यात होत आहेत.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असल्याचे जुन्नरचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी सांगितले.

मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी करण्याचे काम सुरू असून मतदार यादी १० नोहेंबरला प्रसिद्ध होईल. मतदार यादीवर २२ नोहेंबर पर्यंत आक्षेप व हरकती नोंदविता येतील.त्यावर १ डिसेंबर रोजी निर्णय घेण्यात येऊन ६ डिसेंम्बरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

निवडणुकीचा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून २२ डिसेंबर पर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करता येतील.२३ डिसेंबरला छाननी होऊन २४ डिसेंबरला वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यांनतर ७ जानेवारी २२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या एक ने कमी होणार आहे.सोसायटी मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदार संघातून २ व हमाल मापाडी मतदार संघात एक अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक होणार असून पणन मतदार संघातील एक जागा कमी झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले. मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका लांबल्या होत्या. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे निवडणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे कवडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT