power-cut-e1495884674580.jpg
power-cut-e1495884674580.jpg 
पुणे

कोथरूडकरांनो! उद्या 'या' भागात वीजपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान या परिसरातील 60 टक्के भागात महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीची फुरसुंगी ते कोथरूड या 132 केव्ही टॉवर लाईनद्वारे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान बिबवेवाडी परिसरात फुरसुंगी ते कोथरूड टॉवर लाईनची उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम महापारेषणकडून करण्यात येणार आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या टॉवर लाईनची उंची वाढविण्यात येत आहे. या कामामुळे महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणच्या 7 उपकेंद्रांचा सुद्धा वीजपुरवठा बंद राहणार आहे. तथापि महावितरणकडून 21 वीजवाहिन्यांसाठी इतर उपकेंद्रांच्या माध्यमातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार असली तरी कोथरूड विभागातील सुमारे 40 टक्के भागात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषण कंपनीकडून संयुक्तपणे करण्यात आले आहे.

या भागातील वीजपुरवठा होणार ठप्प
गुरुवारी (दि. 13) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणारा परिसर पुढीलप्रमाणे - 

उजवी भुसारी, कचरा डेपो, न्यू इंडिया स्कूल, राहूलनगर, गणेशनगर, शांतीवन, सुंदर गार्डन, गुजरात कॉलनी, स्टेट बँकनगर, वनाज परिवार गृहरचना, भेलकेनगर, गणंजय सोसायटी, आशिषविहार, ज्ञानेश्वर कॉलनी, शंकर नगरी, शास्त्रीनगर, डावी भुसारी, वेदभवन, गुरुजन सोसायटी, भारतीनगर, एकलव्य कॉलेज, पीएमटी डेपो, पुजा पार्क, सुरजनगर, डहाणकर कॉलनी, महात्मा सोसायटी, नर्मदा हाईट्‌स, आनंदवन शोभापार्क, कुंबरे हाईट्‌स, हॅपी कॉलनी, वारजे गाव, पाप्यूलर पेस्टीज, रामनगर, अहिरेगाव, दांगट इंडस्ट्रियल इस्टेट, ईशान्य नगरी, तिरुपती नगर, टेलिफोन एक्सचेंज, खानवस्ती, चैतन्य नगरी, पश्चिमानगरी, साईशिल्प, गिरीश सोसायटी, श्रीराम सोसायटी, नादब्रम्ह सोसायटी, वारजे नाका, स्वप्नशिल्प नगरी, सिटी प्राईड, बिगबझार, किर्लोस्कर महिला उद्योग, कृती इंडस्ट्रियल इस्टेट, श्रीमान सोसायटी परिसर, कुलश्री कॉलनी, वेदांतनगरी, शाहू कॉलनी, पद्मरेखा सोसायटी, सहवास सोसायटी, मावळे आळी परिसर, कर्वेनगर गल्ली क्र 25 ते 10, थोरात गल्ली, शाहू कॉलनी 1 ते 11, हिंगणे, कर्वेनगर, नवसह्याद्गी भाग 22, माळवाडी, शिंदे पूल, गणपती माथा, सहयोग नगर, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, इंद्गनगरी, पारिजात नगरी परिसर, पंचालपुरी परिसर, दामोदर व्हिला परिसर, लोढा हॉस्पिटल परिसर, पंचरत्न टॉवर परिसर, ऋतुरंग काकडे कन्स्ट्रक्शन परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, कासट शॉप परिसर, मयूर कॉलनी, मृत्यूंजय कॉलनी, आनंदनगरचा भाग, नवअजंठा परिसर, हिमाली सोसायटी, सुमा शिल्प लगतचा परिसर, भांडारकर रोड, मेहंदळे गॅरेज, गणेशनगर, खिलारेवस्ती, संजिवन हॉस्पिटल, आनंदमयी सोसायटी, स्विकार हॉटेल, स्वरुप हौसिंग सोसायटी, राजमयूर सोसायटी, कृष्णानगर सोसायटी, एरंडवणे गावठाण, नरहरी सोसायटी, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, भारती निवास कॉलनी, थोरात कॉलनी, केतकर रोड, इन्कमटॅक्स लेन, फिल्म अ‍ॅण्ड टिव्ही इन्स्टिट्यूट, विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी, अशोक पथ, मानस लेन, शांतीशिला सोसायटी, फत्तेलाल गल्ली, गरवारे कॉलेज रोड, खिलारेवाडी, कोकण मित्र मंडळ, डेक्कन पोलीस स्टेशन, भोसले शिंदे आर्केड, संभाजी पार्क, जेएम रोड आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT