electricity for agriculture pump used for other work pune chakan
electricity for agriculture pump used for other work pune chakan Sakal
पुणे

Chakan : कृषी पंपासाठी म्हणून वीज जोड घ्यायचा, आणि वापर मात्र दुसरीकडे करायचा प्रकार मोठया प्रमाणात सुरु

हरिदास कड

चाकण : राज्यात कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांसाठी दिलेल्या सवलतीच्या दराची रक्कम सरकारकडून महावितरणला दिली जाते.

राज्यात अनेक ठिकाणी कृषीपंपासाठी म्हणून विद्युत जोड घ्यायचा आणि पुरवठा मात्र फार्म हाऊस, रिसॉर्ट व इतर उद्योग, राहिवासी वस्तीसाठी करायचा हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.अशाप्रकारे विजबिल कमी करण्याचा मार्ग अनेकांनी अवलंबिला आहे हे वास्तव आहे.

राज्याच्या विविध भागात तसेच जिल्ह्यात काही आर्थिक तडजोडी करून कृषी पंपधारक म्हणून फार्महाऊसला वीजजोड,रिसॉर्ट, पार्क ला वीज पुरवठा घेतला जातो असेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

ज्या व्यक्तींचे फार्म हाऊस, रिसॉर्ट आहे,काही उद्योग आहेत त्या ग्राहकांनी स्वतंत्र वीज मीटर घेणे आवश्यक आहे . त्या वीज ग्राहकांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे. वीज बिल कमी यावा यासाठी अनेकांनी कृषी पंपाच्या नावाखाली फार्म हाऊस, रीसॉर्ट, पार्क ला ला वीजपुरवठा घेतला आहे.

यामुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका होत आहे.याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यात

कृषिपंपाना सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो.कृषीपंपांना वीजदरात सवलत योजना ही राज्य शासनाची आहे. राज्यात सर्वत्र ती लागू आहे. या योजनेअंतर्गत कृषीपंपाचा वापर केल्यानंतर आलेल्या एकूण विजेच्या वापरावर साठ टक्के सवलत मिळते . वीजबिल देयकातील फक्त चाळीस टक्के रक्कम कृषीपंपधारकाने द्यायची असते .

महावितरणकडून देण्यात येणाऱ्या साठ टक्के सवलतीची रक्कम शासनाकडून महावितरणला देण्यात येते. राज्यात सरासरी वीजपुरवठा हा साडेसहा रुपये प्रतियुनिटने केला जातो.कृषी पंपांना फक्त एक रुपया 88 पैसे या सवलतीच्या दराने वीज दिली जाते .

महावितरणने वीज वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे गट वेगवेगळे केले आहेत .त्या गटानुसार तसेच वापरानुसार विज बिल दिले जाते.अनेक ठिकाणी कृषी पंपाच्या नावाखाली फार्म हाऊस,रिसॉर्ट,पार्क ला वीज घेतली जाते.

राज्यात, जिल्ह्यात धरणाच्या ठिकाणी धरण परिसरात, डोंगराळ भागात असलेल्या फार्म हाऊस, रिसॉर्टला स्वतंत्र वीज मीटर घेण्यात यावा व त्याद्वारे वीज वापरण्यात यावी असा महावितरणचा नियम आहे.  परंतु तो नियम धाब्यावर बसवला जातो व वीजचोऱ्या अहोरात्र केल्या जातात.अनेक ठिकाणी आर्थिक तडजोड करून वीजजोड देण्यात येतात असे प्रकार घडत आहेत.वीज कंपनीच्या शोध मोहिमेतून हे प्रकार उघडकीस येतात.

राज्यात, जिल्ह्यात धरण परिसरात तसेच डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांनजीक असलेल्या फार्म हाऊस, रिसॉर्ट, पार्क यामध्ये विशेषत:कृषी पंपाच्या नावाखाली वीजजोड पुरवठा घेतला जातो. अशा प्रकारे वीजपुरवठा घेऊन त्याचा सर्रास वापर केला जातो. वीज वितरण कंपनीचे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.यासाठी महावितरणच्यावतीने शोध मोहीम राबविली पाहिजे.

खेड,राजगुरुनगर चे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी सांगितले की," कृषी पंपाच्या नावाखाली इतर उद्योगांना वीज पुरवठा घेण्याचे प्रकार काही जणांकडून घडत आहेत. त्यामुळे वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. यासाठी शोध मोहीम घेण्यात येणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT