पुणे

महावितरणचे पालिकेवर खापर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘स्मार्ट सिटी’चा टेंभा मिरविणाऱ्या पुणे शहरातील विद्युतव्यवस्थेची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. दोन दिवस विद्युतपुरवठा सुरळीत करता-करता महावितरणच्या नाकीनऊ आले आहे. महापालिकेकडून फांद्या तोडण्यासाठी न मिळणारी परवानगी आणि रस्त्यांचे खोदकाम करताना भूमिगत वाहिन्या खराब झाल्याने विजेचा प्रश्‍न निर्माण झाला, असे दावा करीत महावितरणने याचे खापर महापालिकेवर फोडले आहे.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून इन्फ्रा एक आणि इन्फ्रा दोन या प्रकल्पांचे काम सुरू आहे. यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून भूमिगत वीजवाहिन्या टाकणे, उपकेंद्रात सुधारणा व ती अद्ययावत करणे अशी कामे केली जात आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेनेही कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत भूमिगत वीजवाहिन्या टाकल्या आहेत. शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा, उपकरणांची दुरुस्ती करता यावी, यासाठी दर गुरुवारी शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित केला जातो. तरीही, पहिल्याच पावसात महावितरणच्या कामाचे धिंडवडे निघाले.

शहरात रविवारी (ता. ९) वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तर, अनेक ठिकाणी अचानक वीजपुरवठा बंद झाला. काही उपकेंद्रातील मुख्य वाहिन्यांमधून वीजपुरवठा खंडित झाला. त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी (ता.१०) रात्रीपर्यंत  सुरू होते.

महावितरणला फांद्या तोडण्यास महापालिकेच्या उद्यान विभागाकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे या फांद्या विजेच्या तारांवर पडून नुकसान होते. त्याचप्रमाणे शहरात वर्षभर खोदकाम सुरू असते. त्यामध्ये वीजवाहिन्या खराब होतात. 
- सचिन तालेवार, मुख्य अभियंता, महावितरण  

फांद्या तोडण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली नाही, हे महावितरणने दाखवून द्यावे. शहरात खोदकाम करताना वीजवाहिन्या खराब होऊ नयेत, याच्या सूचना असतात. महावितरणने आमच्याशी संपर्क साधून काय अपेक्षित होते, हे सांगायला हवे होते.
- राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT