पुणे

आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात

CD

PNE26W30170
सोलापूर : शहर भाजप कार्यालयात आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाप्रसंगी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल आदी.
---
आणीबाणी हा लोकशाहीवरील सर्वांत मोठा आघात
अरविंद जोशी; भाजपतर्फे ‘आणीबाणीची ५१ वर्षे’ विषयावर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : देशात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील सर्वांत मोठा आघात होता. लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या काळातील घटनांचे स्मरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.
आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने शहर कार्यालयात ‘आणीबाणीची ५१ वर्षे’ या विषयावरील व्याख्यान आयोजिले होते. यावेळी आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करून कारावास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, सरचिटणीस तथा नगरसेवक प्रा. डॉ. नारायण बनसोडे, सरचिटणीस शिवराज सरतापे, सुधा अळ्ळीमोरे आदी उपस्थित होते.
व्याख्यानात अरविंद जोशी यांनी आणीबाणीच्या काळातील विविध घटनांचा ऐतिहासिक संदर्भासह आढावा घेतला. प्रसार माध्यमांवर लादण्यात आलेली सेन्सॉरशिप, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अटकसत्र, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरील निर्बंध, राज्यघटनेतील वादग्रस्त दुरुस्त्या आणि लोकशाही संस्थांवर झालेला परिणाम याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अनेक देशभक्तांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून आजच्या पिढीने इतिहासातून बोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्या व मोर्चांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
चौकट
तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान
यावेळी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले रामचंद्र तडवळकर, गुरुराज कुलकर्णी, भारत तांबोळकर, जगदीश तुळजापूरकर आणि शिरीष कुलकर्णी यांचा भाजपतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT