शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी
तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा
राजू शेट्टी ः अकोल्यात दशरथ सावंत यांचा सन्मान
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेची उदासीनता यामुळे शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. केवळ सरकारकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
अकोले (जि. अहिल्यानगर) येथे राष्ट्र सेवा दलातर्फे अकोले येथे दशरथ सावंत यांचा शेट्टी यांच्या हस्ते ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुरस्काराने भव्य सन्मान करण्यात आला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की आज शेतकरी हतबल झाला असून, धोरणांच्या जाळ्यात अडकला आहे. अशा परिस्थितीत सावंत यांच्यासारखे नवे नेतृत्व तरुण पिढीतून घडणे आवश्यक आहे. कोणत्याही पदाची अथवा पक्षाची अपेक्षा न ठेवता सावंत यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले. हाच त्यांच्या कार्याचा खरा मानबिंदू आहे. शेतकरी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आहेत. केवळ सरकारकडे पाहून चालणार नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा.
सुशिला दादासाहेब रुपवते, ॲड. संघराज रुपवते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, कॉम्रेड कारभारी उगले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.