पुणे - बालमजुरी प्रथेविरुध्द राबविलेल्या मोहिमेच्या समारोपप्रसंगी विकास पनवेलकर यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी.
पुणे - बालमजुरी प्रथेविरुध्द राबविलेल्या मोहिमेच्या समारोपप्रसंगी विकास पनवेलकर यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी. 
पुणे

बालकामगार प्रथा संपुष्टात आणा - विकास पनवेलकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटण करण्यासाठी समाजातील घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी केले. 
कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, अतिरिक्‍त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ आणि कामगार उपायुक्‍त विकास पनवेलकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविली. त्याच्या समारोपप्रसंगी पनवेलकर बोलत होते. 

जिल्ह्यातील वीटभट्ट्यांच्या मालकांकडून बालकामगार ठेवणार नाही, असे हमीपत्र भरून घेतले. वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, रेडिओ स्टेशन, दूरदर्शनच्या माध्यमातून जागृतीही केली. अंगणवाडी, आशा सेविकांच्या सहकार्याने पालकांच्या बैठका घेतल्या. मुलांना कामावर न पाठविण्याबाबत प्रबोधन केले. औंध येथील रिलायन्स मॉल, वेस्टॅंण्ड मॉल, बालगंधर्व नाट्यगृह, अमनोरा हडपसर, फिनिक्‍स मॉल आणि नगर रस्ता या ठिकाणी बालकामगार प्रथेविरुद्ध पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आवाहनानुसार महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बालकामगार न ठेवण्याची सामुदायिक शपथ घेतली. अभिनेता सयाजी शिंदे यांनी मालक वर्गाला बालकामगार ठेवू नयेत, असे आवाहन केले. तसेच, प्रथेविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविली. फिरत्या वाहनांतूनही आवाहन केले. मोहिमेत एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कामगार आस्थापनांचे मालक, संघटनांचे पदाधिकारी, अंगणवाडी, आशा सेविका आणि औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांच्या मालकांनी योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT