पुणे

नंदकर आश्रमशाळेत इंग्लिश रीडिंग फन-फेअर

CD

फुलवडे, ता. ३१ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथील श्री. नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शाश्वत संस्था मंचर यांच्या वतीने इंग्लिश रीडिंग फन-फेअर उत्साहात झाले.
या उपक्रमाचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेबद्दलची भीती कमी करून त्यांना आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन, लेखन आणि संभाषण करता यावे हा आहे. इंग्लिश लिटरसी प्रोग्राम हा अभिनव उपक्रम आश्रमशाळेत जुलै २०२५पासून दर शनिवारी व रविवारी सुरू करण्यात आला असून पाचवी ते दहावीतील १३५ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. याबद्दल संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव नंदकर यांनी शाश्वत संस्थेचे आभार मानले.
इंग्रजी वाचन मजेशीर खेळांतर्गत विविध विषयांवर बोलणे, चित्ररचना, संभाषण, पुस्तक वाचन, भाषांतर या सहा प्रकारातून प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रत्येक खेळात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
सहा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः अनुष्का पारधी, तेजस मधे, नितीन पथवे, आर्या काळे, करिष्मा काळे, प्रणाली वालकोळी, सारिका जाधव.
यावेळी शाश्वत संस्थेचे कोषाध्यक्ष अशोक आढाव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विश्वस्त प्रतिभा तांबे, सुलोचना गवारी, शांताराम गुंजाळ, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक याप्रसंगी उपस्थित होते. उपक्रमाच्या मुख्य प्रशिक्षिका निकिता थोरात व सहाय्यक शिक्षिका सुप्रिया कामठे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाधान बिरारीस यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT