पुणे

प्रगणकांना मानधन कधी

CD

प्रगणकांना मोबदला मिळणार कधी?

सुटीत जनगणनेच्‍या कामासाठी केली पायपीट; आता ‘एसआयआर’चे जोखड

सातारा, ता. ६ : उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद न घेता शिक्षक प्रगणकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कडाक्याच्या उन्हातही घर अन् घर टिपत जनगणनेचे काम केले; परंतु त्यांच्या या पायपिटीचा मोबदला अद्यापही दिला गेलेला नाही. अशातच त्यांना विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची जोखड त्यांच्या खांद्यावर दिली आहे. यामुळे यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

जनगणना २०२७ याच्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत घरगणना करण्यात आली. या टप्प्यातील शासन निधी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिला जाणार आहे. त्यातून जनगणना प्रगणक, पर्यवेक्षक, जनगणना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, बाह्यस्रोत मनुष्यबळाचा मोबदला, जनगणना प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षण भत्ता, प्रशिक्षण खर्च, संगणक व तत्सम साहित्य, भाडेतत्त्वावरील वाहने, इंधन खर्च आदींचा समावेश आहे.

केंद्रीय जनगणना कायदा १९४८ आणि जनगणना नियमावली १९९० यांच्या कायदेशीर चौकटीत ही जनगणना होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत देशाची जनगणना २०२७ ला मंजुरी देण्यात आली. ही जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा घरांची यादी तयार करणे आणि घरगणना अशा प्रकारे झाला आहे.
यावेळी कुटुंब प्रमुखाकडून ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलित केली गेली. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेतून मिळाली.
................................
कोट
जनगणनेची कामे जास्त प्रमाणात आम्हालाच (शिक्षकांना) होती. ते काम पूर्ण करूनही अद्याप मानधन मिळालेले नाही. पालिकेत चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले जात आहे.
- एक प्रगणक
.....................................
अशी होती स्‍थिती
- जनगणनेच्या कामासाठी सातारा पालिकेत ३२० प्रगणकांकडून कामकाज
- जनगणनेसाठी पालिकेत एकूण ५५ पर्यवेक्षकांनी केले कामकाज
- प्रगणकांचे मानधन : १० हजार २०० रुपये
- पर्यवेक्षक : १० हजार २०० रुपये
--------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

SCROLL FOR NEXT