manchar news
manchar news 
पुणे

मरण डोळ्यासमोर दिसत होते ; तरुणच ठरले देवदूत

डी.के.वळसे पाटील

मंचर : खडकाला पाण्याने वेढा दिला होता, दिवस मावळतीकडे जसा झुकत होता, तसा अंगाचा थरकाप चालला होता, मरण डोळ्यासमोर दिसत होते. रामनाम सत्य आहे, असे म्हणण्याची वेळ आली होती. देवाचा धावा सुरु होता. दोन जणांनी माझा हात पकडून पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतरच माझा जीव वाचला. ते तरुण म्हणजेच माझ्या दृष्टीने देवदूतच होते, असे घोड नदीच्या पुराच्या पाण्यातून वाचलेल्या शशिकला दत्तात्रय डोके या वृद्धेने सांगितले.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुराच्या पात्रात खडकावर शुक्रवारी (ता. २५) डोके अडकल्या होत्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून  बाहेर काढण्यात यश आले आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

शनिवारी (ता.२६) दुपारी सकाळ प्रतिनिधीने शशिकला यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी त्या नदीवर गेल्या होत्या. काही कपडे धुतल्यानंतर नदीचे पाणी वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. खडकाला पाण्याने वेढा घातल्याने त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. नदी काठावर असलेला त्यांचा मुलगा प्रकाश डोके व त्याच्यासह इतर लोकांनी त्यांना खडकाला चिटकून राहण्याचे सांगितले. "मी खडकाला घट्ट पकडून ठेवले होते. जोरदार पाण्याच्या लाटे बरोबर सर्व कपडे वाहून गेले, अंधार पडू लागल्याने भीतीमुळे माझ्या छातीतील धडधड वाढू लागली. थंडीही वाजत होती. गळ्यापर्यत पाणी आले. मुलगा व नातवंडे डोळ्यासमोर आली. आता आपली जीवन यात्रा संपणार असे वाटू लागल्याने डोळे बंद करून देवाचा धावा सुरु केला. तेव्ह्ड्यात कुणीतरी आपल्या जवळ आल्याची चाहूल लागली. माझे हात पकडून आजीबाई घाबरू नका असा आवाज कानावर पडला. अंधारात मला दोन तीन जण ओढत घेऊन घोडनदीच्या किनार्यावर घेऊन आले."

मला वाचविलेल्या या तरुणांना विघ्न्हर्त्याने मोठ आयुष्य द्यावं अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT