Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

अपघात विमा योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांच्या कुटुंबीयांसाठी आखलेल्या अपघात विमा योजनेचा लाभ नागरिकांऐवजी विमा कंपनीला होत आहे. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेत आता स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. कुटुंबाप्रमुखासह पत्नी, आई-वडील आणि दोन मुलांसह सहा सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  

मिळकतकर वेळेत भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना’ सुरू केली आहे. पहिल्या वर्षी योजनेतून केवळ मिळकतधारकालाच लाभ देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

त्यात मिळकतधारकामागे ८५ रुपयांचा विम्याचा हप्ता (प्रीमियम) होता. त्यानुसार पहिल्या वर्षी केवळ १५ मिळकतधारकांना या योजनेचा लाभ झाला. दुसऱ्या वर्षी जेमतेम ३० जणांना योजनेचा फायदा मिळाला. या योजनेचा विस्तार करीत त्यात कुटुंबातील अन्य सदस्यांनाही गेल्या वर्षी सामावून घेण्यात आले. मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर विमा हप्त्यापोटी गेल्या अडीच वर्षांत सुमारे १५ कोटी रुपये भरण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

मिळकतधारक आणि त्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्यास या योजनेतून कुटुंबीयांना पाच लाख रुपये मिळतील. २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यांचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत. आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील. जखमी झालेल्या सदस्याला एका वर्षात एक लाख रुपये मिळणार आहेत. तसेच पूर्णत: अपंगत्व आल्यास पाच लाख मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT