पुणे

कारखान्यांचे खर्च वाढले; इथेनॉलचे दर ''जैसे थे''च

CD

सोमेश्वरनगर, ता. २६ : मागील तीन वर्षांत कारखान्यांच्या सर्व प्रकारच्या खर्चात वाढ झाली मात्र, केंद्रसरकारने तीन वर्षांत रसापासून आणि बी हेवी मोलासेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात कवडीचीही वाढ केलेली नाही. सहा वर्षांच्या विचार केला तरीही प्रतिलिटर तीन रुपयांच्या आसपास नाममात्र वाढ आहे. सी हेवी मोलासेसपासूनच्या इथेनॉलमध्ये काहीशी वाढ दिसत आहे. त्यामुळे सद्य:स्थित इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर किमान पाच ते सहा रुपये दरवाढीची मागणी होत आहे.
केंद्रसरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरवातीला साखर उद्योगानेच जोरदार प्रतिसाद दिला. नंतर धान्याधारित डिस्टिलरी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या इथेनॉल खरेदीला व किमतीला तुलनेने झुकते माप दिले गेले. आज मकेच्या इथेनॉलची किंमत ७१ रूपये ८६ पैसै आहे तर उसाच्या रसाच्या इथेनॉलची किंमत ६५ रुपये ६१ पैसे प्रतिलिटर आहे. त्यामुळे चार-पाच वर्षांतच धान्याधारित इथेनॉलचा वाटा ६९ टक्क्यांवर झेपावला तर साखरउद्योग ३१ टक्क्यांवर अडकला आहे. साखरउद्योगाला आता इथेनॉलचा पुरेसा कोटा तर मिळाला नाहीच पण किमतीत वाढ करणेही वर्षानुवर्षे टाळले आहे. त्यामुळे ''आधी पळण्यासाठी ताकद द्यायची आणि चांगले धावू लागताच तोंडावर पाडायचे'' अशी अवस्था होऊ लागली आहे. इथेनॉलनिर्मितीला बुस्ट देण्यासाठी केंद्रसरकाराने २०२०-२१ मध्ये अवघे आठ टक्के इथेनॉलमिश्रण असताना रसापासूनच्या इथेनॉलला ६२ रुपये ६५ पैसे तर बी हेवी इथेनॉलला ५७ रुपये ६१ पैसे असे समाधानकारक दर दिले. सी हेवी पेक्षा रसापासूनच्या इथेनॉलला तब्बल १७ रुपये प्रतिलिटर अधिकचे मिळत होते. त्यामुळे रसापासून इथेनॉलनिर्मितीसाठी धडाधड प्रस्ताव आले आणि चक्क २०२४-२५ मध्येच पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले. आता तीस टक्के इथेनॉल मिश्रणाइतकी डिस्टिलरींची क्षमता आहे; मात्र दर चांगले नाहीत. सध्या सी हेवी इथेनॉल आणि रसापासून इथेनॉलच्या दरात फक्त साडेसात रुपये प्रतिलिटर फरक आहे.

सहा वर्षांत कवडीमोलाची वाढ
मागील सहा वर्षांत रसापासूनच्या इथेनॉलमध्ये २ रुपये ९६ पैसे, बी हेवी इथेनॉलमध्ये ३ रुपये १२ पैसे इतकी कवडीमोलाची वाढ झाली आहे. सी हेवीमध्ये १२ रुपये २८ पैसे अशी समाधानकारक वाढ आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे २०२२-२३ च्या दरवाढीनंतर गेली तीन वर्षे रस आणि बी हेवी इथेनॉलच्या दरामध्ये एक नया पैशाचीही वाढ झालेली नाही.

पाच-सहा वर्षांत डिस्टिलरीचा व्यवस्थापन खर्च, केमीकल, कामगार पगार, वाहतूक अशा सगळ्याच खर्चांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तीन वर्षांपासून इथेनॉलचे दर मात्र जैसे थे आहेत.
-पी. जी. परकाळे, डिस्टिलरी व्यवस्थापक
सर्व प्रकारच्या इथेनॉलच्या दरात कमीत कमी पाच ते सहा रुपये प्रतिलिटर वाढ झाली तरच कारखान्यांना परवडणार आहे.
- शहाजी भगत, कार्यकारी संचालक, वारणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT