२२ सप्टेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत रविवार आणि दिवाळीची सुट्टी (१ ते १५ नोव्हेंबर) मिळून एकूण ३१ सुट्ट्या आहेत; तसेच, प्रथम सत्र परीक्षेचे ९ दिवस असे एकूण ४० दिवस जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शिकवण्यासाठी शिक्षकांना जास्तीत जास्त ८ आठवड्यांचे (८×६ = ४८) दिवसच उपलब्ध होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिवाळी उशिरा असल्याने १३ दिवस जास्त मिळत असले, तरी काही शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यासक्रम कमी ठेवण्यात आला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, विद्यार्थ्यांनी आता सण-सुट्ट्यांमध्ये जास्त न रमता आजपासूनच सत्र परीक्षेचा नियमित अभ्यास करावा व परीक्षेत उत्तम यश मिळवावे.
दिवाळीच्या सुट्टीत (दिवाळीचे ५-६ दिवस वगळून) पहिल्या सत्रातील सर्व विषयांची उजळणी पूर्ण करावी. कारण १६ नोव्हेंबरला दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर प्रथम सत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका वाटण्यातच कमीत कमी दोन दिवस जातील. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सर्वच शिक्षकांनी नियोजनबद्ध अध्यापन करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. २८ डिसेंबर २०२६ ते ११ जानेवारी २०२७ या कालावधीत शाळांना सराव परीक्षा घ्यावीच लागेल; तरच २५ जानेवारी २०२७ पर्यंत सराव परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांना दाखवता येतील. कारण २८ जानेवारीपासून बोर्डाची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहे.
- - दीनानाथ द. गोरे, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.