पुणे

दिव्यांग महाविद्यालयाची बारावीत दमदार कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : पुणे विभागातील एकमेव कर्णबधिर दिव्यांग महाविद्यालय असलेल्या टिंगरेनगर येथील स्व. सी. आर. रंगनाथन कर्णबधिर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेचा निकाल 100 टक्के, तर वाणिज्य शाखेचे हे पहिले वर्ष असूनही 92 टक्के निकाल लागला. 

कला शाखेतून प्रसाद सोपान गराडे हा 73.85 टक्के मिळवून पहिला, समृद्धी विठ्ठल दौंडकर ही 73.38 टक्के मिळवून द्वितीय, तर गणपती काशिनाथ मोरे हा 71.85 मिळवून तृतीय आला. वाणिज्य शाखेतून हेमंत पांडुरंग चव्हाण हा 56.92 टक्के मिळवून पहिला, वर्षा सुहास सोनसळे ही 55.53 टक्के मिळवून द्वितीय, तर आदिती दीपक वाणी ही 54. 61 टक्के मिळवून तृतीय आली. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेश कांबळे, अधिव्याख्याते रोहित जाधव, प्रकाश सदाकळे, डॉ. प्रियंका जोशी, स्वरूपा जोशी, माधुरी गाडेकर, अक्षय कुमार घेरडी, रोहिनी गुरव, सुरेखा झुंजारे या अध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील उच्च शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कर्णबधिर दिव्यांग महाविद्यालयातून पूर्ण करावे. तसेच, भविष्यातही असेच यश संपादित करावे, अशा शुभेच्छा आवाहन संस्थापक अध्यक्ष व्ही. बी. पाटोळे यांनी दिल्या.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT