Mobile App Sakal
पुणे

महसुली अर्धन्यायिक प्रकरणांच्या निकालांना गती

महसूल विभागात अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना पूर्वी मॅन्युअल पद्धतीने कामकाज चालायचे.

सकाळ वृत्तसेवा

महसूल विभागात अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना पूर्वी मॅन्युअल पद्धतीने कामकाज चालायचे.

पुणे - महसूल विभागात अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना पूर्वी मॅन्युअल पद्धतीने कामकाज चालायचे. वकील, पक्षकारांना तारखा लिहून घ्याव्या लागायच्या... सुनावणीच्या वेळेस वकील व पक्षकारांची एकच गर्दी...परिणामी त्यांना सुनावणीसाठी ताटकळत बसावे लागत होते. प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढत होते. त्यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘इक्यूजे कोर्ट लाइव्ह बोर्ड’ ही मोबाईल ॲप ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली. या अभिनव उपक्रमाचा वकील, पक्षकारांना फायदा होत असून, प्रशासनाकडून प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

प्रक्रिया सुटसुटीत -

सुनावणी बोर्ड आणि बजावणी बोर्ड अशी विभागणी करून त्याचे दिवस निश्चित केले. बजावणी बोर्डमध्ये नोटीस न बजावलेल्या तसेच कोर्टाची कागदपत्रे न आलेल्या अपरिपक्व प्रकरणांचा समावेश असतो. सुनावणी बोर्डावर फक्त परिपक्व प्रकरणे घेतली जातात. प्रकरणाचा निर्णय ‘इक्यूजे कोर्ट’च्या संकेतस्थळावर अपलोड केला जातो. त्यानंतर पक्षकारांना सर्टिफाइड नकला दिल्या जातात, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

‘इक्यूजे कोर्ट लाइव्ह बोर्ड’ ॲपची वैशिष्ट्ये -

- आदल्या दिवशी सायंकाळी सुनावणीच्या वेळा मोबाईल ॲपवर

- मोबाईलवर केसची सद्यःस्थिती, वादी-प्रतिवादी याची माहिती

- अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, रिसेप्शन, कॅन्टीनमध्ये स्मार्ट स्क्रीनची सुविधा

- जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडल अधिकारी कार्यालयात सुविधा

- ‘इक्यूजे कोर्ट लाइव्ह बोर्ड पुणे’ मोबाईल ॲपवर उपलब्ध.

पक्षकारांना मिळणाऱ्या सुविधा -

- पक्षकारांना सुनावणीची संभाव्य वेळ समजल्यामुळे नियोजन शक्य.

- बोर्ड रद्द झाल्यावर अगर वेळ बदलल्यास आगाऊ सूचना

- सर्टिफाईड नक्कल ऑनलाइन उपलब्ध

वकिलांसाठी कोणत्या सुविधा -

- मोबाईल ॲपवर आदल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता बोर्ड अपलोड

- केसेसची सद्यःस्थिती ऑनलाइन उपलब्ध, कार्यालयातील चकरा कमी होतात

- बजावणी नोटीस व्हाट्सअपवर उपलब्ध

प्रशासनाच्या कामकाजात सुलभता -

- सुनावणी असलेल्या वकील व पक्षकारांच्या उपस्थितीत वाढ

- कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात वाढ

- जुन्या केसेस निकाली काढण्यासाठी प्रभावी नियंत्रण

महसुली न्यायालयाच्या कामात पारदर्शकता आणि गतिमानता आली आहे. युनिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यभर राबविण्याचे नियोजन आहे. भविष्यात पक्षकार आणि वकिलांना इ-फायलिंगची सुविधा उपलब्ध करून देणे, इ-फेरफार आणि इक्यूजे कोर्ट प्रणाली लिंक करणे आणि पक्षकारांना डिजिटल सहीद्वारे निकालाची प्रत देण्यात येईल.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे

प्लेस्टोअरवर EQJ Court Live Board मोबाईल ॲप

  • कालावधी : १ ऑक्टोबर २०१८ ते २० सप्टेंबर २०२०

  • दाखल प्रकरणे : १६५१

  • निकाली काढलेली प्रकरणे : १३१४

  • कालावधी : १ ऑक्टोबर २०२० ते २० सप्टेंबर २०२२

  • दाखल प्रकरणे : २३१०

  • निकाली काढलेली प्रकरणे : २९५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT