Bike Fire
Bike Fire Sakal
पुणे

आजच खरेदी केलेल्या महागड्या दुचाकीने घेतला रस्त्यातच पेट

डी. के वळसे पाटील

पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (तालुका आंबेगाव) येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारासचालत्या दुचाकीने पेट घेतला.

मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (तालुका आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 28 ) रात्री साडेआठच्या सुमारासचालत्या दुचाकीने पेट घेतला. प्रसंगावधान राखून दोघांनीही मोटरसायकलचा वेग कमी करून मोटरसायकल सोडून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

एकलहरे येथील चिकन दुकानात सिराज मुराद शेख (राहणार टोकवडे, तालुका खेड) हा तरुण कामाला आहे. त्याने आजच R15 ही हिरव्या रंगाची दुचाकी जुन्नर येथून विकत आणली होती. तो व त्याचा मित्र सदर गाडीची ट्रायल मारायला जात होते. सदर दुचाकी ही सायलंसरच्या बाजूने पेटली. सदर दोन युवकांनी गाडी थांबवून त्यावरून उड्या घेतल्या.

तेंव्हा एका मुलाला किरकोळ हाताला भाजले आहे. त्याचे नाव समजले नाही. आयुब शेख, ज्ञानेश्वर डोके पोलीस नाईक सुदाम घोडे यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. सदर गाडी मालक गाडी तशीच ठेऊन सदर गाडीची कागदपत्र आणण्यासाठी जुन्नरला गेल्याची माहिती समजते.

दरम्यान, सदर दुचाकी महागडी असून तिची बाजारात सध्या किंमत दोन लाख रुपये आहे. सदर दुचाकी चे मॉडेल २०१८ चे आहे. आगीच्या कारणाचा शोध मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होड ग र घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT