NPT26B09130
नातेपुते (ता. माळशिरस) : नातेपुते बायपास परिसरात टाकून देण्यात आलेल्या मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या.
---
नातेपुते बायपासवर मुदतबाह्य शीतपेयांचा ढीग
अन्न व औषध प्रशासनाच्या धाकामुळे विक्रीऐवजी नष्ट करण्याचा प्रयत्न?
शीतपेये नष्ट करण्यासाठी पळापळ सुरू
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. २२ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील नातेपुते बायपास परिसरात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य शीतपेयांचा साठा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. निर्जनस्थळी शीतपेयांच्या बाटल्यांचे ढीग आढळून आल्याने या शीतपेयांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित शीतपेयांचा साठा किरकोळ किंवा घाऊक विक्रेत्यांनी आणून टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवर कारवाईचा धाक वाढल्यामुळे अशा वस्तूंची विक्री करण्याऐवजी त्यांची गुपचूप विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच या परिसरात हजारो रुपयांचा मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या आणून टाकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अशा प्रकारांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
---
कोट
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा वापर करून काही कनिष्ठ अधिकारी गावोगावी फिरून वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. महाराष्ट्र भेसळमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून संशयास्पद प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी.
- अप्पासाहेब कर्चे, मनसे नेते, माढा लोकसभा मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.