Pune University sakal
पुणे

Pune University : विद्यापीठातील लाचखोरी लाजिरवाणी ; विद्यार्थी समितीचे कुलगुरूंना पत्र,तक्रार निवारण केंद्राची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रात प्रबंधासाठी लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रात प्रबंधासाठी लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ही अत्यंत लाजिरवाणी व विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारी घटना आहे. त्यांच्यावर तातडीने आळा घालावा, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना केली आहे. या संदर्भात सत्यशोधन समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.

समितीने संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कुलगुरूंना पत्र दिले. त्यात ते म्हणतात, ‘‘घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून स्वतंत्र सत्यशोधन समिती स्थापन करावी. सखोल चौकशीनंतर दोषींवर योग्य कारवाई करावी. अशा घटना पुढे घडणार नाहीत, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी निवृत्त वरिष्ठ प्राध्यापकांच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र पीएच.डी. तक्रार निवारण केंद्राची व्यवस्था करावी. जेणेकरून संशोधक विद्यार्थी तक्रारी नोंदवू शकतील.’’

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील संशोधन केंद्रातील पीएच.डी. शुल्कात समानता असावी

  • काही मार्गदर्शकांनी प्रोग्रेस रिपोर्ट आणि जेआरएफ फेलोशिप अर्जावरती सहीसाठी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी

  • ज्या केंद्रावर संशोधनासाठी उपयुक्त सेवा-सुविधा उपलब्ध नसतील अशा संशोधन केंद्राची तत्काळ मान्यता रद्द करावी

  • विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या केंद्राच्या प्रमुखांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी

  • री-रजिस्ट्रेशन व एक्स्टेंशनसंदर्भात परिपत्रक काढून निराकरण करावे

संशोधन केंद्रावर केंद्रप्रमुख व मार्गदर्शक प्राध्यापक विद्यार्थ्यांना सातत्याने दबावात ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करत आहेत. दबावामुळे बरेच विद्यार्थी कुणाचीही तक्रार करत नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी तत्काळ आमच्याशी अथवा विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधावा.

- राहुल ससाणे,

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT