Marksheet 
पुणे

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशअर्जास मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सीईटी सेलची साइट हॅंग होणे, कागदपत्र अपलोड न होणे आणि विद्यापीठांकडून निकालपत्र न मिळणे या कारणामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी काही अभ्यासक्रमांची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. त्यानंतर सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्याभरापासून सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. राज्यातील विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केले असले तरी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. सोमवारी (ता. १४) थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असताना संकेतस्थळ दुपारपासून हॅंग झाले. त्यामुळे सीईटी सेलकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन, मुदतवाढ दिली. एमबीए प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने ॲटमा, झॅट, जीमॅट आणि मॅट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, असे आदेश दिल्याने त्यातही मुदतवाढ दिली आहे.

अभ्यासक्रम व अर्ज भरण्याची सुधारित मुदत 
पदवी

अभियांत्रिकी प्रथम वर्ष - २२ डिसेंबर
अभियांत्रिकी द्वितीय वर्ष - २१ डिसेंबर
फार्मसी प्रथम वर्ष - २१ डिसेंबर 
फार्मसी थेट द्वितीय वर्ष - २१ डिसेंबर 
आर्किटेक्‍चर - २० डिसेंबर 
हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी - २३ डिसेंबर

पदव्युत्तर पदवी 
एमबीए-एमएमएस - २० डिसेंबर 
एमएई-एमटेक - २४ डिसेंबर
एमसीए - २३ डिसेंबर, 
एम. फार्म. - २३ डिसेंबर 
एम. आर्किटेक्‍चर - २३ डिसेंबर

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT