पुणे - फेसबुकवर झालेल्या ओळखीतून विक्रीकर निरीक्षक महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठवितो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने पाच लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेची मागील वर्षी फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली होती. त्या व्यक्तीने आपण परदेशात वास्तव्यास असल्याचे सांगून व सातत्याने संपर्क ठेवत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने महिलेस परदेशातून महागडे कपडे व वस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. भेटवस्तू भारतात पाठविल्याचे सांगितले, मात्र ती भेटवस्तू ताब्यात घेण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगून महिलेस एका बॅंक खात्यामध्ये वेळोवेळी पाच लाख रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले.
महिलेने पाच लाख रुपये भरल्यानंतरही संबंधित व्यक्ती पैशांची मागणी करू लागल्याने फिर्यादीला संशय आला. त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कविराज जांभळे करीत आहेत.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.