Dr Rajesh Deshmukh Sakal
पुणे

Cyber Crime: सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? फेसबूक अकाऊंट काढून...

राज्यात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहेत. मोठमोठ्या अधिकाऱ्यांवर सायबर चोरट्यांची करडी नजर असल्याचं दिसून येत आहे. गेल्याच महिन्यात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचे खोटे फेसबूक अकाऊंट बनवण्यात आले होते. अशात आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यासोबत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात "माही वर्मा" या नावाने फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. अशात आता पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव वापरून बनावट फेसबूक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Latest Marathi News)

rajesh deshmukh

यापूर्वी ४ ते ५ वेळेला त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्यांच्या मित्र परिवारातील अनेकांना रिक्वेस्ट सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे.

फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे. तसेच या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी तीन वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT