The family was beaten to death due to the misunderstanding of arrival for beating
The family was beaten to death due to the misunderstanding of arrival for beating 
पुणे

मारहाणीसाठी आल्याच्या गैरसमजातून कुटुंबाला बेदम मारहाण; सावत्र भावाचा हातच मोडला

सकाळवृत्तसेवा

पुणे : भांडणामध्ये जखमी झालेल्या भावाला पाहण्यासाठी आलेल्या व्यक्ती मारहाण करण्यासाठीच आल्या आहेत, असा गैसमज करून घेत तिघांनी सावत्र भावासह त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या मारहाणीमध्ये सावत्र भावाचा हात मोडला. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजता डायस प्लॉट येथे घडली. स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली 

लक्ष्मण पांडुरंग पवळे (वय 45), विजय लक्ष्मण पवळे (वय 22, दोघेही रा.गुलटेकडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर यांना अजय लक्ष्मण पवळे (वय 24) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कृष्णा पांडुरंग पवळे (वय 37, रा.शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा पवळे व आरोपी लक्ष्मण पवळे हे दोघेही सावत्र भाऊ आहेत. कृष्णा पवळे यांचा लहान भाऊ मारुती याला संशयित आरोपींनी मारहाण केली होती. त्यामुळे कृष्णा हे त्यांच्या आई व बहिणीसह लहान भावाला भेटण्यासाठी डायस प्लॉट येथे गेले होते. त्यावेळी लक्ष्मण पवळे व त्यांच्या इतर भावांना कृष्णा व त्याचे कुटुंब आपल्याला मारहाण करण्यासाठी आले आहे, असा गैरसमज झाला. त्यांनी कृष्णा हा काही बोलण्यापुर्वीच त्यांना शिवीगाळ करीत क्रिकेट खेळण्याची बॅट व स्टंपने कृष्णाला मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमध्ये कृष्णाचा डाव हात मोडला. त्याचवेळी आरोपींनी कृष्णाच्या आई व लहान बहिणीलाही जबर मारहाण केली. या घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीस तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत
 
फेसबुक फ्रेंडने केला घात; तरुणीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT