suicide sakal
पुणे

Vadgaon Nimbalkar News : चित्रीकरण करून शेतकऱ्याने संपविले स्वतःचे जीवन

शेतीच्या वादाबाबत सरकारी यंत्रणेकडे तक्रारी करूनही केले दुर्लक्ष.

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर - आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी सरकारी यंत्रणेकडे वेळोवेळी करूनही दुर्लक्ष केले जाते. यामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्याने चित्रीकरण करत विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नीरा नदीकाठी लाटे ता. बारामती येथे शनिवार ता. १३ दुपारी घडला.

हनुमंत पांडुरंग सणस (वय-७० वर्षे, रा. लाटे, ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. विषारी औषध घेतल्यानंतर तातडीने बारामती येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. उपचारादरम्यान रविवार ता. १४ रोजी मृत्यू झाला. वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळतात तातडीने त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत जयवंत पांडुरंग सणस, रा. लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजूबाजूचे त्रास देणारे शेतकरी अभिजित उर्फ बाबासो सोपान घुले, अमर दत्तात्रय दुधाने, रा. पुणे, मोहन उर्फ बजीरंग शंकर कोळेकर, संभाजी महादेव खलाटे, प्रकाश बाबुलाल माने, सर्व रा. लाटे, ता. बारामती. त्यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून मयत सणस पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस अधिकारी यांच्याकडे आपल्या शेतातून बेकायदा पाणी आणि वीज सोडली जात असल्याच्या तक्रारी करत होते. परंतु याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले उलट मयत सणस यांनाच धमकावले जात असल्याचे मृत्यूपूर्वी केलेल्या चित्रीकरणात म्हटले आहे.

संबंधित व्यक्तींची नावे घेऊन याबाबतची चिट्ठी ठेवली असल्याचा उल्लेख केला आहे. सरकारी यंत्रणेकडून होत असलेल्या दुर्लक्षित कामकाजाबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT