शेतकरी-वारकरी विचारांचे
मराठा महासंघांचा शिवजागर
संभाजी दहातोंडे ः अहिल्यानगरला महासंघाची विभागीय बैठक
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सावतामाळी या थोर संत परंपरेच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. सध्या राज्यात निर्माण होत असलेल्या जाती-पातीच्या भिंतींमुळे आणि राजकारणामुळे राज्याचा सामूहिक विकास खुंटला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने राज्यात शेतकरी-वारकरी विचारांचा शिवजागर उपक्रम सुरू केला आहे, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.
अहिल्यानगर येथे महासंघांची विभागीय आढावा बैठक झाली. प्रा. राज गवांदे, बिभीषण खोसे, सुनील चौधरी, रावसाहेब मरकड, सुनील निमसे, ज्ञानेश्वर फसले, शामराव पवार, संतोष हंबर, नानाभाऊ डोंगरे, संतोष पागिरे, दत्ता शिंदे आणि डॉ. ज्ञानदेव कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दहातोंडे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्याच विचारांवर चालण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सारथी’, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ व ‘ओबीसी महामंडळ’ यांच्या माध्यमातून विस्थापित व सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा सुटकेला ३६० वर्षे पूर्ण आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्थापनेला सव्वाशे वर्षे झाले असल्याने शेतकरी आणि वारकरी विचाराने शिवजागर उपक्रम सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.