पुणे

शेतकऱ्यांचा विरोध

CD

मोबदला निश्चितीशिवाय
शासकीय प्रक्रिया स्वीकारणार नाही

थर्ड आउटर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा इशारा; बैठकीत ठराव

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : थर्ड आउटर रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला निश्चित झाल्याशिवाय भूसंपादनाशी संबंधित कोणतीही शासकीय प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही, असा एकमताने ठराव शेतकरी संघर्ष सेनेच्या बैठकीत करण्यात आला. झिंगाबाई टाकळी येथील सभागृहात नऊ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत दिलीप कुकडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. सारंग झाडे यांनी संघटनेने शासन व प्रशासनाकडे सादर केलेली निवेदने, केलेला पत्रव्यवहार, पाठपुरावा तसेच आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
डॉ. मनीष आगलावे यांनी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम-२०१३ मधील तरतुदींची माहिती देत बाजारभाव निश्चितीचे निकष, मोबदला ठरविण्याची कायदेशीर प्रक्रिया आणि बाधित शेतकऱ्यांचे अधिकार या विषयी मार्गदर्शन केले. शासनाकडून निश्चित करण्यात येणारा मोबदला कायद्यानुसार आहे की नाही, याची प्रत्येक शेतकऱ्याने पडताळणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील समस्या मांडल्या. योग्य व न्याय्य मोबदला निश्चित होईपर्यंत जमीन मोजणी, सर्व्हेक्षण, मोजमाप किंवा भूसंपादनाशी संबंधित कोणतीही पुढील शासकीय प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
बैठकीला डॉ. मधुसूदन मैंद, संजय मैंद, सुधाकर उमाळे, डॉ. अशोक पवार, नरेंद्र खडतकर, राजेंद्र केदार, दिलीप खडतकर, वैभव घोंगे, डॉ. गाडे, सुनीता टेकाडे, दीप झाडे, अविनाश तायवाडे, भावेश हिंगे यांच्यासह नऊही तालुक्यांतील पदाधिकारी, प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT