farmers protest for water 12 demands ncp mp supriya sule pune politics
farmers protest for water 12 demands ncp mp supriya sule pune politics Sakal
पुणे

Pune News : जनाई योजनेद्वारे हक्काचे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण, सुप्रिया सुळे यांची उपोषण कर्त्यांशी चर्चा

जयराम सुपेकर

Pune News : शेतीसाठी आम्हाला पाणी मिळणार कधी. आम्ही जगायचं कसं. गेल्या तीन पिढ्या पाण्यासाठी गेल्या, आमचीही चालली. जनाई उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासुन कित्येक शेतकऱ्यांना पाण्याचा एक टिपकाही मिळाला नाही.

पाण्यासाठी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. व्यथीत शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने, तीव्र शब्दात व्यक्त केलेल्या या भावना आहेत. अखेर योजनेचे हक्काचे पाणी नियमीत मिळण्यासाठी सुपे (ता.बारामती) येथील ग्रामसचिवालयाच्या आवारात शुक्रवारपासून (ता.२६) आमरण उपोषण सुरू केले आहे.

हक्काच्या पाण्यासाठी एकूण १२ मागण्या लाभधारक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या उपोषणाला बारामती, पुरंदर व दौंड तालुक्यातील लाभधारक गावातील शेतकऱ्यांनी पाठींबा दर्शवला आहे. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शिवपुतळ्यास पुष्पहार घालून बाजार पेठेतून घोषणा देत, पदयात्रेने येऊन उपोषणास शेतकऱ्यांनी प्रारंभ केल्याची माहिती उपोषण स्थळी देण्यात आली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

लागलीच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधला. तुम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या - उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची एकत्रित बैठक घेऊन यातून मार्ग काढणार आहे. झालेली सर्व चर्चा ट्विटरद्वारे मांडणार आहे.

सुळे म्हणाल्या - जनाई योजनेच्या हक्काच्या पाण्याबाबत अन्याय झाला आहे. याविषयी लोकप्रतिनीधी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. वेळ पडली तर तुमच्या बरोबर उपोषणास बसेल. जनाई योजनेचे व्हाईट पेपरची मागणी करत आहे. यात राजकीय जोडे बाजुला ठेऊन लक्ष घालणार आहे.

दरम्यान, योजना अद्यापही अपूर्ण आहे. अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. सुरूवातीला ५७ कोटींची योजना आतापर्यंत साडेचारशे कोटी खर्च झालेत. कालव्यात जमिनी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.

वितरिका क्रमांक सहाची कामे झाली नाहीत. बंद पाईपाईपातून मिळावे. अशा १२ मागण्यांविषयी सविस्तर माहिती शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपटराव खैरे, ज्ञानदेव कौले, विठ्ठल जरा़ड आदींसह शेतकऱ्यांनी सुळे यांच्याशी बोलताना मांडल्या.

पाण्यासाठी आता कवर फसवताः

आता कसं जगावं पंचाईत पडलीय. कवा पाणी देता. विचार करा आमच्या गरीबाचा, शेतकऱ्याचा. सांगा पाणी का येत नाही आमाला. पाणी मिळत तवर मी हलणार नाही. तीन पिढ्या गेल्या. आता आमाला कवर फसवतां. अत्यंत पोटतिडकीने उपस्थितांमधून एका महिला शेतकऱ्याने ही व्यथा माडली.

त्यावर सुळे म्हणाल्या - जशा वेदना तुम्हाला होतात. तशा आम्हाला होतात. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, इमानदारी ही माझी ताकत आहे. मी कोणाला फसवले नाही. मतासाठी खोटे बोलणार नाही. जनाईच्या पाण्याबाबत रोज पुढाकाराने अद्ययावत माहिती घेणार आहे. तुम्हाला उपोषणाची वेळ येऊ देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT