पुणे

जमावबंदी आदेश धुडकावत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी केला विरोध , मोजणी न करता अधिकारी परतले.

CD

VRG26B06230
गौडगाव (ता. बार्शी) : येथील शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांसमोर विरोध दर्शवताना शेतकरी.
---
शक्तिपीठ महामार्ग मोजणीला तीव्र विरोध
गाैडगावात शेतकरी रस्त्यावर; मोजणी न करताच अधिकारी परतले
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. २७ : नागपूर- गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील नऊ गावांतील जमिनींच्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने प्रशासनाला मोजणी न करताच परतावे लागले. संभाव्य तणाव लक्षात घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले होते. २६ व २७ फेब्रुवारी दरम्यान मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते.
गौडगाव (ता. बार्शी) येथे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे हे मोठ्या पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी शेतकऱ्यांना मोजणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले; मात्र शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास स्पष्ट नकार देत ठाम भूमिका घेतली.
दुपारी १२.४० वाजता नितीन शहाजी भड यांच्या गट क्रमांक ८८/३ मध्ये मोजणीसाठी अधिकारी पोचले असता संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर तीव्र विरोध नोंदविला. त्यामुळे स्थळ पंचनामा करून अधिकारी व पोलिस दुपारी अडीचच्या सुमारास परतले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोचविण्यात येतील, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
---
चौकट
बाधित नऊ गावे
गौडगाव, रातंजन, मालेगाव, आंबेगाव, आंबाबाईचीवाडी, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपन व शेळगाव (आर) या गावांतील जमिनी भूसंपादनासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ च्या कलम १५(२) अन्वये ७ मार्च २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे.
---
कोट
यापूर्वीचा नागपूर-रत्नागिरी चार पदरी महामार्ग असताना, नव्या शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी? आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून जमिनी भूसंपादन होऊ देणार नाही.
- रविराज पाटील, शेतकरी, हत्तीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Horoscope : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु ! अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

SCROLL FOR NEXT