KOR26B11223
करमाळा ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देताना बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम संदीप मारकड, दादासाहेब लबडे, भीमराव गाडगे व इतर.
ऊसदरासह विविध मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला रास्ता रोको
करमाळा, ता. १३ : ऊसदरासह शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर ऊसदर मिळावा, २०२६ मधील दुष्काळ निधीचे पाच हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, यांसह अन्य मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शेकडो शेतकरी आणि विविध गावांतील सरपंचांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात २० नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून लेखी उत्तर द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वीकारले. यावेळी पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, धनंजय शिरसकर यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते. मागण्यांची दखल न घेतल्यास २० नोव्हेंबरला लोकशाही मार्गाने रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बहुजन संघर्ष सेनेने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.