krushik 2024 exhibition inauguration
krushik 2024 exhibition inauguration sakal
पुणे

Sharad Pawar : शेतक-यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा

मिलिंद संगई

बारामती - जमीन कमी होते आहे व शेतीवरील अवलंबित्व वाढत आहे. शेतीवरचा बोजा कमी करण्याबरोबरच कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित 'कृषिक 2024' या शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच मायक्रोसॉफ्ट, बिल गेटस फाऊंडेशन, ऑक्सफर्डच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या फॉर्म ऑफ द फ्युचर या उपक्रमाचे उद्घाटन कर्नाटकचे कृषिमंत्री एन चेलुवरयास्वामी यांच्या हस्ते शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले, त्या प्रसंगी पवार बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळे, अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, अँग्री पायलटचे संचालक डॉ. प्रशांत मिश्रा, महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाबार्डच्या रश्मी दराड, मायक्रोसॉफ्टचे मंदार कुलकर्णी, विजय शिखरे, दिलीप झेंडे, अनिल रावळ, स्वामी रेड्डी, सपना नवरीयो, एस. के. राव, संस्थेच्या सचिव सुनंदा पवार, डॉ. रजनी इंदुलकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, 54 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. विकास कामांसाठी शेतजमीन मोठ्या प्रमाणात अधिग्रहीत होते, दुसरीकडे शेतीवरील अवलंबित्व वाढत आहे, या पुढील काळात कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रातील संशोधन ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषिक सारखे प्रदर्शन महत्वाचे ठरते.

एन. चेलूवरयास्वामी म्हणाले, शरद पवार यांनी देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. अन्नधान्या बाबत देश स्वयंपूर्ण झाला याचे श्रेय शरद पवार यांना द्यावे लागेल. बारामतीत सुरू असलेल्या कामाचे अनुकरण कर्नाटकात आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ग्लोबल वार्मिंगच्या संकटामुळे शेती अडचणीत येत आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी शेती करण्यासाठी कृषिकसारख्या प्रदर्शनांचा फायदा होईल.

प्रशांत मिश्रा म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सध्या घेत असलेल्या पिकांमध्ये चौपट उत्तम पीक कसे घेता येईल यासह तंत्रज्ञानाचा वापर पुढील तीन वर्षात केला जाणार आहे.

प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून आजवर 11 लाख शेतक-यांनी याचा लाभ घेतल्याचे नमूद केले.

सातत्याने काम करत राहणार...

फार्म ऑफ द फ्युचर सुरु करुन आम्ही थांबलेलो नाही, नवीन तंत्रज्ञानावरही आम्ही काम करतो आहोत, जगातील नवीन ज्ञान छोट्या शेतक-यापर्यंत पोहोचविणे हा अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा ध्यास आहे. नवीन तंत्रज्ञान बारामतीत आणून शेतक-यांना त्याचा फायदा करुन द्यायचा, हे काम भविष्यातही केले जाणार आहे.

जगात सर्वोत्तम असलेले तंत्रज्ञान बारामतीत आणण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असेल. स्पेंट वॉश पासून गॅस व पाणी वेगळे करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. पाचटा पासून सीएनजी गॅस व खत तयार करणारे तंत्रज्ञान मिळाले असून त्याचा फायदा आपल्यालाही होईल.-

- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT