पुणे

शेतकऱ्यांनी डोंगर-दऱ्यांतील पाणी पिऊ नये

CD

सोमाटणे, ता. ७ : पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांनी खुरपणी, पिकांतील गवत काढणे, भातातील तण काढणे आदी शेतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. मात्र, शेतीची कामे करताना ओढे, नाले, भातखाचरे तसेच डोंगर-दऱ्यांमधील पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ओढे-नाले किंवा डोंगर-दऱ्यांतील पाणी स्वच्छ दिसत असले तरी जंगलातील व शेतातील गवत, वनस्पतींची पाने कुजल्यामुळे त्यामध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. असे पाणी प्यायल्यास विविध आजार होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी जाताना पिण्यासाठी घरूनच शुद्ध पाणी घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शेतात काम करताना साप किंवा इतर सरपटणारे प्राणी आढळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्राथमिक आरोग्य केंद्र आढलेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT