family court Sakal
पुणे

Family Court : वडिलांना भेटणे हा मुलांचा अधिकार; कौटुंबिक न्यायालयाचा आदेश

माझे पप्पा कुठे आहेत. मला त्यांना भेटायचे आहे, असे सातत्याने आईला म्हणणाऱ्या चार वर्षांच्या निषादला अखेर त्याच्या वडिलांना भेटता येणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - माझे पप्पा कुठे आहेत. मला त्यांना भेटायचे आहे, असे सातत्याने आईला म्हणणाऱ्या चार वर्षांच्या निषादला अखेर त्याच्या वडिलांना भेटता येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो वडिलांना भेटलेला नाही. त्याच्या वडिलांनी देखील त्याला भेटण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर येथील कौटुंबिक न्यायालयाने वडिलांना त्यांच्या मुलाची भेट घेण्याचा आदेश दिला आहे.

वडिलांना भेटण्याचा मुलाला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलाची इच्छा असेल तेव्हा त्याने सुनावणीच्या दिवशी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत न्यायालयात आपल्या वडिलांना भेटावे. वडिलांनी त्या वेळेत न्यायालयात हजर राहावे. तसेच भेटीदरम्यान आई किंवा वडिलांना कोणत्याही प्रकराचा वाद करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

निषादचे वडील रमेश आणि सविता (नावे बदललेली) हे दोघेही आयटीत कामाला आहेत. वैचारिक मतभेद आणि दोघांच्या उत्पन्नात असलेली तफावत यामुळे त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे रमेश यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भांडणामुळे दोघेही वेगळे राहत असून रमेश हे गेल्या तीन वर्षांपासून मुलाला भेटलेले नाहीत.

त्यामुळे निषादने आईला माझे पप्पा कुठे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे, असा हट्ट वारंवर केला. मात्र रमेश यांनी या काळात मुलाची भेट घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मुलाची भेट घ्यावी यासाठी सविता यांनी ॲड. रोहित माळी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज मान्य करीत न्यायालयाने रमेश यांना मुलाला ठरलेल्या वेळेत भेटावे, असा आदेश दिला आहे.

भेटीच्या वेळी वाद करायचा नाही :

पत्नी भांडकुदळ स्वभावाची आहे. मुलाच्या भेटीवेळी पत्नी जुन्या भांडणावरून पुन्हा वाद करेल. त्या वादातून माझ्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्या जातील. भेटीचा अर्ज करून पत्नी घटस्फोटाचा दावा लांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणणे पतीने न्यायालयात दाखल केले आहे. पत्नीच्या अर्जावर दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने सविता यांना मुलाच्या भेटीवेळी पतीबरोबर वाद करायचा नाही. तसेच मुलाची इच्छा असेल तरच त्याला भेटू द्यायचे, असे आदेशात नमूद केले आहे.

आई मुलांना भेटू देत नाही म्हणून वडील न्यायालयात गेल्याची अनेक प्रकरणे आहेत. मात्र या दाव्यात उलटे घडले आहे. मुलाला भेटावे म्हणून आईने न्यायालयात धाव घेतली आहे. मुलांचा विचार करीत पत्नी सर्व वाद विसरून पुन्हा संसार करण्यास तयार होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

त्यामुळे मुलाला भेटल्यानंतर पतीचा विचार बदलेन या भावनेतून पत्नी हा अर्ज केला होता. मात्र अर्ज मंजूर झाल्यानंतरही वडिलांनी भेटायची तयारी दाखवली नाही. वडिलांचा सहवास लाभणे हा मुलाचा हक्क आहे, असा युक्तिवाद या दाव्यात करण्यात आला होता.

- ॲड. रोहित माळी, अर्जदार पत्नीचे वकील

न्यायालयाने आदेशात काय म्हटले?

- ठरवून दिलेल्या वेळेत वडिलांनी मुलाला भेटावे

- भेटीवेळी आई-वडिलांनी कोणताही वाद करू नये

- पालकांना भेटणे हा मुलांचा हक्क

- मुलाची इच्छा असेल तरच त्याला भेटू द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT