FDA
FDA 
पुणे

एफडीएची फ्लोअर मिलवर कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा घेताय? मग जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर ‘बेस्ट बिफोर’ आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोषी आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातून एका मिलला टाळे ठोकले असून, तिघांना सुधारणा नोटीस बजावली आहे.

जय मल्हार फ्लोअर मिलमधून एक लाख ८८ हजार ३८५ किलो माल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ५२ लाख १९ हजार ३८६ रुपये आहे. या मिलमध्ये उत्पादन करण्यासाठी वापरण्यात आलेला गहू आणि पाण्याची तपासणी केली नव्हती. त्याची साठवणूक जमिनीवर करण्यात येत होती. त्यामुळे अन्न नमुने घेऊन माल जप्त करण्यात आल्याची माहिती, ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. 

पूना डाळ अँड बेसन मिल आणि रामप्रसाद रोलर अँड फ्लोअर मिल येथेही दोष आढळल्याने संबंधितांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी पी. एस. काकडे, वंदना रूपनवर, अनिल गवते, अरुण धुळे आणि सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत
बेसन आणि वाटाणा हे पीठ एकाच ठिकाणी करण्यात येत असलेल्या बाँबे हाल अँड बेसन मिलला ‘स्टॉप ॲक्‍टिव्हिटी’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातील बेसनाची तीन आणि वाटाणा पिठाचा एक नमुना तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT