Fear of corona virus infection by exposing used mask 
पुणे

सावधान! वापरलेले मास्क उघड्यावर टाकताय? कोरोना व्हायरसची संक्रमणाची वाढतेय भीती

जयदीप हिरवे

सातगाव पठार(पुणे) : संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. शासन, आरोग्य यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी व नागरिक या महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करत आहेत. या रोगाच्या विषाणूंपासून स्वसरंक्षण करण्यासाठी नागरिक सॅनिटायझर, मास्क इत्यादी साहित्य वापरत आहेत. परंतु, या मास्कमुळेच आजाराचे संरक्षण होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण बहुतांशी नागरीक वापरलेले मास्क रस्त्यावर उघड्यावर फेकून देत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कोरोना संकटाआधी व नंतरच्या परिस्थितीत फार बदल झाला आहे. आधी नागरिक सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी घेत नव्हते. पण सध्याच्या या कोरोनाजन्य परिस्थितीत स्वसरंक्षणासाठी मास्क घातल्याशिवाय नागरिक घराबाहेर निघत नाही. बहुसंख्य लोक मास्क वापर झाल्यावर विल्हेवाट लावतात. काही जण पुन्हा वापरात येणाऱ्या मास्कला पसंती दर्शवीतात. पण हे मास्क खूप वेळेपर्यंत टिकाव धरत नाहीत. या मास्कला लावला असलेला दोरा बहुधा तुटतो, मास्क फाटतो किंवा मळतो. मास्क वापरण्याचा कालावधी संपतो व इतरही तांत्रिक बाबींमुळे आपल्याला तोंडाचा मास्क काढून फेकावा लागतो. पण काही नागरिक वापरलेला सदर मास्क रस्त्याच्या बाजूला, सार्वजनिक ठिकाणी फेकून देतात. त्यामुळे असे मास्क पुढे नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''
वापरलेल्या मास्कमुळे जलप्रदूषण होण्याची भrती नाकारता येत नाही. जर हा मास्क पाण्यात गेला तर, तो पाण्यातच कुजेल व यामुळे जलप्रदुषण होऊन जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो वापरून झालेले मास्क जाळून टाकावेत व पुन्हा वापरात येणारे मास्क स्वच्छ धुवून मगच वापरावेत असा सल्ला पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक मैदाड यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT