Panchnama
Panchnama Sakal
पुणे

पंचनामा : आपुलकीने बायकोला घास भरवा अन्‌ प्रेमाला वय नसतं, हे दाखवा

सु. ल. खुटवड

‘‘हल्ली तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही,’’... मानसीने हे वाक्य उच्चारताच नितीनच्या पोटात गोळा आला. त्याने घाबरतच, ‘‘कशावरून? काय झालं?’’ असं विचारले. मग मानसी गाल फुगवून, फुरंगटून बसत म्हणाली, ‘‘लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आपण एकत्र जेवायचो. तुम्ही तुमच्या ताटातील एक घास मला भरवायचे, नंतर स्वत: एक घास खायचे, असं आपलं जेवण चालायचं. कधी-कधी तर तुम्ही एकही घास खायचे नाही. पण मला भरवायचे. आता करता का तसं?’’ मानसीने विचारले. त्यावर नितीन म्हणाला, ‘‘अगं नवीन नवरी म्हणून तू आली होतीस ना, त्यावेळी तुला स्वयंपाक नीट जमत नव्हता.

त्यामुळे माझ्या ताटात वाढलेलं तुला मी भरवायचो. आता तू स्वयंपाक त्यामानाने खूप चांगला करतेस. त्यामुळे मी तसं करत नाही.’’ असं म्हणून नितीनने जीभ चावली. पण मानसीच्या ध्यानात हा टोमणा न आल्याने त्याने नि:श्वास सोडला. मानसी म्हणाली, ‘‘उद्या माझा वाढदिवस आहे. मला काहीही प्रेझेंट नकोय. फक्त पूर्वीसारखं एका ताटात आपण जेवायला बसायचं अन् तुम्ही मला तुमच्या हाताने भरवायचं. मान्य आहे?’’ मानसीने असं विचारल्यावर नितीनने होकार दिला. ‘‘अगं, उद्या घरकामातून तुला सुटी घे. इकडची काडी, तिकडे करायची नाहीस.

उद्या मी आॅफिसमधून लवकर घरी येतो. पावभाजी व पुलाव मी स्वत: करतो. त्यानंतर तुला प्रेमाने भरवतो. फरशी वगैरे पुसून भांडीही घासतो. तू फक्त हुकूम सोडायचा.’’ नितीनने खुशीत आश्वासन देऊन टाकले. सकाळी लवकर उठून नितीनने झटपट सगळं आवरलं. मानसीला चहा-नाश्त्याबरोबरच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवऱ्याच्या आपुलकीच्या वागण्याने मानसी सुखावली. सगळं घरकाम करून नितीन आॅफिसला पोहचला. सायंकाळी तो लवकरच घरी पोचला व स्वयंपाकाची तयारी करू लागला. नेमकं त्याचवेळी गावावरून नितीनचे आई-वडील कितीतरी महिन्यांनी आले. सासू-सासरे आल्याचे बघताच मानसी लगबगीने किचनमध्ये गेली व ‘मी करते स्वयंपाक, तुम्ही बाहेर बसा,’ असे म्हणू लागली.

पण, नितीनने तिचे काही ऐकले नाही. नऊ वाजता नितीनने आई-वडिलांना वाढलं. जेवणानंतर आई-वडील हाॅलमध्ये टीव्ही पाहात बसले. साडेनऊच्या सुमारास नितीनने एकच ताट केलं व ते घेऊन हाॅलमध्ये आला व मानसीला शेजारी बसवले. ‘‘तुम्ही जेवा. मी नंतर जेवते,’’ असं मानसीने म्हटलं; पण नितीननं अजिबात ऐकलं नाही. तिला घास भरवू लागला. पण, सासू-सासरे सोफ्यावर बसलेत आणि त्यांच्यासमोर नवरा आपल्याला घास भरवतोय, हे पाहून ती कमालीची लाजली.’’

‘‘अहोऽऽ... नकोऽऽ... मी जेवते माझ्या हाताने...’’ असं म्हणू लागली. पण, नितीनने त्याला विरोध केला. ‘‘तुझीच इच्छा मी पूर्ण करतोय ना.’’ असं म्हणून तो मानसीला घास भरवू लागला. जेवणानंतर नितीनने सर्व खरकटे काढले. फरशी पुसली आणि भांडीही घासली. ‘‘मी तुला दिलेला शब्द पाळला की नाही. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे.’’ नितीनने हसत-हसत म्हटले. मात्र सासू-सासऱ्यांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे ती संकोचून गेली होती. अकराच्या सुमारास दोघे बेडरूममध्ये गेली. त्यावेळी नितीनच्या आई-वडिलांनी हाॅलमध्ये अंथरूण घातले.

‘‘काय यांची नाही ती थेरं,’’ असं म्हणून नितीनच्या आईने नाक मुरडले. तर त्याचे वडील म्हणाले, ‘‘मी तुला सांगत होतो, लग्नानंतर नितीन निव्वळ नंदीबैलासारखा वागतोय. तो बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय. स्वत:च्या डोळ्यांनी बघितलंस म्हणून तुला आता खरं वाटलं.’’ असं म्हणून शेजारच्या बॉक्समधील बाकरवडी व सोनपापडी ते बायकोला भरवू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT