corona
corona 
पुणे

पुरंदरला कोरोनाचा वेढा, कोरोनाचे आणखी पंधरा नवीन रुग्ण 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात आज कोरोनाचे पंधरा नवीन रुग्ण सापडले. त्यात एकट्या सासवड शहरातील तेरा जण आहेत. तसेच, तालुक्यातील कुंभारवळण येथे दोन रुग्ण सापडले.  सासवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 48 वरून 61 वर पोचली असून, तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 87 झाली आहे. 

सासवड शहरासह पुरंदर तालुक्यात गेल्या दहा दिवसांत कोरोना संसर्गाचा वेग जास्त आहे.  चार दिवसांपूर्वीच सकाळी रुग्ण संख्येत सासवड 31 वर होते. आज एकदम 61 वर पोचून अल्पावधीत 30 रुग्ण वाढले.  तालुका या दिवसात 50 वरून 87 वर गेला आहे. आजच्या पाॅझिटिव्ह 15 पैकी 13 रुग्ण सासवडचे व दोन नजिकच्या कुंभारवळण  गावातील नविन रुग्ण आहे. पंधरापैकी नऊ रुग्ण अगोदरच्या रुग्ण संपर्कातील व सहा नवीन आहेत. 

सासवड येथे कोरोना रोखण्यासाठी वेगळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, सासवड शहर पुणे शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग अजून वाढण्याचा धोका आहे. पुणे कनेक्शनमधून सासवड व परिसरातील संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पुणे व बाहेर ये - जा करणारे काम उरकून आल्यावर होम क्वारंटाइन न राहिल्यास सासवड शहरातील परिस्थितीत फरक पडू शकत नाही, असे जाणकारांनी सांगितले. तसेच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूर्ण  लाॅकडाउन दहा दिवसांसाठी काही जाणकरांनी सुचविला आहे.  मात्र, प्रशासन याबाबत अपेक्षित हालचाल करत नसल्याने अडचणीत भर पडत आहे, असे अनेक नागरिकांनी सांगितले. 

सासवड शहरात नित्यपणे रुग्ण आढळून येण्याचे सत्र थांबत नाही.  हा सासवडकरांना धोका आहे. कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेग असाच कायम राहिला, तर खुपच अवघड होणार आहे. शहरातील निम्म्याहून अधिक लोक शिस्त पाळत नाहीत.  त्यामुळे सासवड शहरावर निश्चित कोणाचे तरी नियंत्रण हवे व वेगळा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT