Scholarship Sakal
पुणे

पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

मीनाक्षी गुरव

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी (Fifth) आणि आठवीची (Eight) २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) पुढे ढकलण्यात (Postpond) आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या नवीन तारखा (New Date) लवकरच कळविण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याचे अधिकृत परिपत्रक देखील पुढील सोमवारपर्यंत (ता. १०) काढण्यात येणार आहे. (Fifth Eighth Scholarship Exams Postponed)

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अशात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मात्र २३ मे रोजी होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान कोरोनाचे संकट घोंघावत असताना या परीक्षा मे महिन्यात घेण्याला शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविला जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला स्थगिती द्यावी, परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

दरवर्षी फेब्रुवारीत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून २३ मे रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय ३० मार्चला घेण्यात आला. दरम्यान परीक्षा परीषदेकडून परीक्षा आयोजनाची पूर्ण तयारी झाली आहे. त्याशिवाय प्रश्नपत्रिका छपाई सुरू झालेली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती प्रतिकूल असेल, तर परीक्षा रद्द करण्याएवजी काही काळासाठी पुढे ढकलणे उचित ठरेल, अशा मागणीचा प्रस्ताव सुपे यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे पाठविला आहे. त्यानुसार लवकरच शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहे.

- शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत, तर आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.

- शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा

- दरवर्षी फेब्रुवारीत होणारी परीक्षा यंदा २५ एप्रिलला होणार होती. ती पुढे ढकलली

- आता ही २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले

- राज्यातून सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याचा आदेश लवकरच

‘इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी निश्चित केलेली शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा रद्द केलेली नाही, तर तुर्तास ही परीक्षा पुढे ढकलली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा अधिकृत आदेश सोमवारीपर्यंत काढण्यात येईल,’

- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT