result sakal
पुणे

अखेर एमआयडीसीच्या निकालाची प्रतिक्षा संपली

तब्बल साडे तीन महिन्यांनतर १५ डिसेंबरला लागणार निकाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उमेदवारांनी उठवलेला आवाज आणि माध्यमांच्या भूमिकेनंतर महाराष्‍ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) सरळसेवा भरतीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. तब्बल साडे तीन महिन्यांनतर बुधवारी (ता.१५) गट क आणि ड च्या संवर्गातील पदांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना महामंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

महामंडळाच्या वतीने २०१९ मध्ये ८६५ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कोरोनामुळे भरती प्रक्रिया सव्वा दोन वर्षे रखडली होती. अखेर ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ मध्ये ही परीक्षा पार पडली होती. परंतु परीक्षेचा निकाल साडे तीन महिन्यानंतरही जाहीर होत नसल्यामुळे उमेदवार धास्तावले होते. राज्यातील आरोग्यभरतीतील गैरव्यवहारामुळे एमआयडीसीच्या भरतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सकाळने सातत्याने हा विषय लावून धरला आहे. अखेरीस महामंडळाने गुरुवारी (ता.९) प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख घोषित केली आहे.

उशिरा का होईनात महामंडळाने निकालाची तारीख जाहीर केल्याचे समाधान आहे. निकाल पारदर्शकपणे लावून पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी.

- अक्षय क्षीरसागर, उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT