पुणे

कऱ्हाड दुष्काळग्रस्त कुटुंबांना सहा महिने १५ हजारांची मदत द्या

CD

दुष्काळग्रस्त कुटुंबांना सहा महिने मदत द्या

तहसीलदारांना निवेदन; दरमहा १५ हजार देण्याची मागणी

कऱ्हाड, ता. २ ः दुष्काळसदृश स्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यांना पुढील सहा महिने दरमहा १५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटनांतर्फे तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे केली आहे.
दुष्काळग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक आधार द्यावा, शेतकऱ्यांची वीजबिल व कर्जवसुली थांबवावी, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, अशा १९ मागण्या निवेदन केल्या आहेत.
महाराष्ट्र दुष्काळ निवारण, निर्मूलन समिती, कृती समिती, ग्रामीण हक्क संघर्ष मंच आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे निवेदन दिले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, विद्याधर गायकवाड, वंचितचे शहराध्यक्ष संतोष बोलके, कऱ्हाड उत्तरचे संतोष किरात, कऱ्हाड दक्षिणचे उपाध्यक्ष भागवत कांबळे, शेतकरी संघटनेचे आनंदराव थोरात उपस्थित होते.
दुष्काळाचा परिणाम शेतीपुरता मर्यादित नाही. तो ग्रामीण भागातील रोजगार, शिक्षण, पशुधन अर्थव्यवस्थेवर होत आहे. शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई म्हणाले, ‘‘वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दहा हॉर्सपॉवरच्या कृषिपंपांच्या थकीत वीजबिलांसाठी महावितरणकडून तगादा लावला जात असेल, तसेच फायनान्स कंपन्या, पतसंस्था आणि बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असेल, तर संबंधित शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाशी संपर्क साधावा.’’
निवेदनात दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावण्या किंवा पर्यायी चारा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, महिला बचतगट, मच्छिमार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष मदत व उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी केली आहे. त्यासह दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या उपाययोजना न करता गावनिहाय आराखडा तयार करावा. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. निवेदनातील मागण्यांवर १५ दिवसांत कार्यवाही करून त्याचा अहवाल द्यावा.

-----------------------

63587
कऱ्हाड ः विविध संघटानांतर्फे दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन कल्पना ढवळे यांना देताना संग्राम पवार, विद्याधर गायकवाड, संतोष बोलके, संतोष किरात, भागवत कांबळे आदी.

-----------------------

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोकलेन अंगावर पडून शेतकरी मजुराचा मृत्यू

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT