junnar 
पुणे

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबास आर्थिक मदत

दत्ता म्हसकर

जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तान्हाजी सीताराम मिंढे या शेतकऱ्याने 31 ऑगस्टला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मिंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा तान्हाजी मिंढे यांचा परिवार. या कुटुंबाला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज, जुन्नर शिवनेरीच्या वतीने 1 लाख 18 हजार 800 रुपयांचा मदतनिधी गोळा करण्यात आला.

जुन्नरचे तहसिलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते तान्हाजी मिंढे यांच्या पत्नी कविता मिंढे यांजकडे सुपूर्त करण्यात आला. याबाबतची माहिती अशी की, शेतात उत्पादित केलेल्या शेतमालाला दोन वर्षे समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने भांडवलही सुटत नव्हते. त्यामुळे भांडवलासाठी 
हात उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे या नैराश्यातून तान्हाजी मिंढे याने आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने दत्ता म्हसकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजबांधवाना मदतीचे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत समाज बांधवांनी तब्बल 1 लाख 18 हजार 800 रुपयांची आर्थिक मदत जमा केली. नारायणगाव येथून सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, संजय वाजगे, सुजित खैरे यांनी भरीव मदत केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील ढोबळे यांनी व समाजबांधवांनी कविता मिंढे यांचे भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून त्या खात्यात ही रक्कम जमा केली. पोस्टाचे पासबुक तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते कविता मिंढे यांजकडे सुपूर्त करण्यात आले. काकडे यांनी सकल मराठा समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शासन पातळीवर मदतीची तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ता म्हसकर, सुनील ढोबळे, मिननाथ पानसरे, भास्कर पानसरे, संजय खंडागळे, मंडलाधिकारी रोहिदास सुपे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT