पुणे

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत युवकांना मिळणार आर्थिक पाठबळ 

डी. के. वळसे पाटील

मंचर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील मराठा समाजातील एक हजार ५३२ लाभार्थ्यांना आत्तापर्यंत विविध बँकेमार्फत ८८ कोटी ३२ लाख ८८ हजार ७४२ रुपये कर्ज वाटप  केले आहे. एक हजार ६४ लाभार्थ्यांना तीन कोटी १३ लाख ३५२  रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे. महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे कार्यालयामार्फत केले जाते. ही समाधानाची बाब आहे, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले.

पुणे येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्रात झालेल्या आढावा बैठकीत पवार बोलत होते. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार,  जिल्हा अग्रणी बॅकेचे नोडल अधिकारी, महामंडळाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेला तालुकास्तरावर वेळोवेळी प्रसिद्धी द्यावी. मराठा समाजातील युवक युवतींनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा. नोकरीच्या मागे न लागता मराठा समाजातील युवकांनी स्वतः उद्योजक बनावे. अशी अपेक्षा संजय पवार यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणी युवक तसेच उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महामंडळाकडून व्यवसायिक कर्जावरील व्याज परतावा योजना व शेतकरी उत्पादक गटांना थेट कर्ज पुरवठा योजना राबविल्या जातात. यासाठी युवकांना सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देणा-या बॅकांचा देखील गौरव करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

युवकांनी फसवणुकीपासून सावधान  राहावे. कारण महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज व्याज परतावा मंजुरी पत्रासाठी कोणत्याही प्रकारचे  शुल्क आकारले जात नाही. महामंडळाच्या योजनेबाबत माहिती हवी असल्यास थेट महामंडळ जिल्हा कार्यालयाला संपर्क करावा. खाजगी संस्थांकडून अथवा व्यक्तीकडून महामंडळ कोणत्याही प्रकारची कामे करवून घेत नाही. किंवा तसे कुठल्याही प्रकाचे  कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे कसल्याही प्रकारचा अमिषाला बळी न पडता समाजातील तरुणांनी फसवणुकीपासून सावधान राहावे.-संजय पवार, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT