fire accident 2 injured fire at general store pune fire brigade hospital health police Sakal
पुणे

Fire Accident : घरगुती वस्तु विक्रीच्या दुकानात सोमवारी पहाटे भीषण स्फोट; 2 जखमी

सातारा रस्ता परिसरात सोमवारी पहाटे घडली घटना, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : सातारा रस्त्यावरील एका घरगुती व स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या वस्तु विक्रीच्या दुकानामध्ये सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुकानासह अन्य सदनिका, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने संपुर्ण परिसर मोठ्या प्रमाणात हादरला. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र इतका मोठा स्फोट नेमका झाला कसा, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून स्फोटाचे कारण अद्याप पुढे आले नाही.

सातारा रस्त्यावरील डि मार्टजवळ "इंद्रनील अपार्टमेंट' आहे. त्यामध्येच "देवयानी होम व किचन अप्लायन्ससेस' नावाचे दुकान आहे. संबंधित दुकानांमधे सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने संबंधित दुकानाच्या भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या, तर दुकानाचे शटर तब्बल शंभर फूट लांब उडून बाजुला पडले. या स्फोटाच्या आवाजाने संपुर्ण परिसर हादरला.

दरम्यान, स्फोटाच्यावेळी लागलेल्या आगील दुकानाचे मालक सुधीर कोलते तसेच रस्त्यावरुन जाणारे हॉटेल व्यावसायिक सागर सणस यांच्या अंगावर दुकानाचे शटर उडून पडल्याने त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नागरीकांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे सात बंब, दोन टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळविले.

""इंद्रनील अपार्टमेंट मधील रहिवासी रविवारी रात्री झोपेत असताना सव्वा दोन च्या सुमारास स्फोट झाला, हादऱ्याने आम्ही सर्व रहिवासी बाहेर पळालो. आगीची तीव्रता वाढत होती, घरातील दरवाजे खिडक्‍या निखळून पडल्या, काय होत आहे, हे कळत नव्हते. स्फोटांच्या भितीमुळे सर्व रहिवासी रस्त्यावर येऊन थांबलो'' असे रहिवासी रोहित कोळी यांनी सांगितले.

स्फोट व आगीमुळे नागरीकांचे नुकसान

दुकानामध्ये झालेला स्फोट व त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये संबंधित दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबरोबरच त्याच्या शेजारीच असणाऱ्या मोबाईलच्या दुकानासह तीन दुकाने जळून खाक झाली. याबरोबरच दुकानाच्या वरील बाजुस असलेल्या तीन सदनिका, दोन कार्यालयांनाही आगीची मोठ्या प्रमाणात झळ पोचली. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने अपार्टमेंटसह शेजारील दोन इमारतीच्या घरांच्या काचा फुटल्या.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

दुकानामध्ये गॅस सिलिंडर नव्हते, मोबाईल बॅटरी, वॉटर प्युरिफायर, चिमण्या, होत्या फ्रीज, कुलर च्या कॉमप्रेसरचे स्फोट झाल्याचा अंदाज आहे. परंतु स्फोटाची तीव्रता पाहता नक्की स्फोट कशामुळे झाला ते सांगता येत नाही असे, अग्निशामक दलाचे कात्रज केंद्राचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले.

दरम्यान, स्फोट झालेल्या दुकानातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तपासणी अहवाल आल्यानंतर स्फोटाचे कारण पुढे येईल, असे सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुकानामध्ये गॅस सिलिंडर नव्हते, रात्री सव्वा दोन हि घटना घडली. स्फोटाची तीव्रता पाहता हा स्फोट नेमका कशाचा आहे, यावरुन नागरीकांमध्ये ऊलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT