pune
pune sakal
पुणे

Pune : वडकीतील चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग

अशोक बालगुडे

उंड्री : वडकी येथील चप्पलच्या गोडाऊनला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. रबरी चप्पल, बूट जळाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाबरोबर नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने जीवितहानी टळली मात्र, वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.

अजय दिनेश जिंदल (रा. हडपसर) यांच्या मालकीचे वडकी (ता. हवेली) येथील जिंदाल गोडाऊनला रात्री अकराच्या सुमारास आग लागली, त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आगीचे वृत्त समजताच काळेबोराटेनगर, कोंढवा खुर्द, पीएमपीआरडी-2, बी.टी. कवडे-2 वाघोली आणि कोंढव्यातील बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाचे अग्निशमनचे जवान राजू शेख, अनिमिष कोणगेकर,कैलास शिंदे, दीपक कद्रे, नीलेश लोणकर, रवी बरटक्के यांच्या पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस नाईक महेश चव्हाण, सत्यवान चव्हाण, बिभीषण कुंठेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बंदोबस्त ठेवला. आग लागल्यामुळे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, गोडावूनच्या शटरचा भाग अचानक कोसळला, त्यामध्ये अग्निशमनच्या जवानाला किरकोळ दुखापत झाली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT