LGBTQ Community Sakal
पुणे

तृतीयपंथीयांसाठी पुण्यात पहिले क्लिनिक

तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या क्लिनिकला शहरात प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयांसाठी (LGBTQ Community) सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या क्लिनिकला (Clinic) शहरात प्रारंभ झाला. शहरातील सुमारे चार हजार तृतीयपंथियांना त्याचा उपयोग होणार आहे. (First Clinic for LGBTQ Community in Pune)

तृतीयपंथीयांना मूलभूत अधिकारांच्या पायमल्लीबरोबरच अनेक समस्या भेडसावतात. तृतीयपंथी व्यक्तींना बहुतांश  वेळा आरोग्य सुविधा, राहण्यासाठी घर मिळत नाही. त्यामुळे त्यांना काही काळ पदपथावर राहावे लागते. या घटकला किफायतशीर दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सोनल दळवी यांनी दिली. तृतीयपंथियांना खासगी रुग्णालयांचे दर परवडत नाही. त्यांच्यासाठी हे क्लिनिक दिलासा ठरेल. या रुग्णालयात अगदी कमी शुल्कात तृतीयपंथीयांच्या सर्व वयोगटातील रुग्णांचे उपचार करण्यात येतील. त्यांच्याकडून तपासणी शुल्क आकारण्यात येणार नाही. क्लिनिकमधील सर्व कर्मचारी हे तृतीयपंथी असतील, असेही त्यांनी सांगितले.

हे लक्षात ठेवा

  • संचेती रुग्णालयाजवळील तुपे इमारतीत तिसऱ्या मजल्यावर क्लिनिक सुरू

  • सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते खुले

  • महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, एलजीबीटी सीबीओ आणि समुदाय यांचे सहकार्य

  • अभिमत विद्यापीठांची वैद्यकीय महाविद्यालये, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या भागीदारीतून आरोग्य सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT