पुणे

लोणंद - लोणंदला साकारणार तालुक्यातील पहिला मियावाकी प्रकल्प.

CD

लोणंदला तालुक्यातील पहिला मियावाकी प्रकल्प

नगरपंचायतीच्या हद्दीत कामास प्रारंभ; ३० हजार वृक्षांची होणार लागवड

लोणंद, ता. २७ : येथील नगरपंचायतीच्या हद्दीत सामाजिक पातळीवरील ठोस वनीकरण योजनेअंतर्गत एक हेक्टर गायरान क्षेत्रावर साकारतोय खंडाळा तालुक्यातील पहिला अटल आनंद घनवन प्रकल्प (मियावाकी) साकारत आहे. या प्रकल्पांतर्गत येथे ४५ पेक्षा अधिक प्रजातीची ऑक्सिजन, फळे, फुले देणाऱ्या वनस्पती, औषधी झाडे, झुडपे आदी ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान, जमीन सपाटीकरण व झाडांसाठी खड्डे खोदाईच्या कामास आज येथे प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला.
या वेळी उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, नगरसेवक सचिन शेळके, सुप्रिया शेळके, रवींद्र क्षीरसागर, सागर शेळके, रशिदा इनामदार, सीमा खरात, दीपाली नीलेश शेळके, दीपाली संदीप शेळके, राजश्री शेळके, ज्योती डोणीकर, तसेच मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सागर गालिंदे, ॲड. गणेश शेळके, बंटी खरात, सुनील यादव, खंडाळा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल अमोल भालेकर, वनरक्षक शिवशंकर दापके, वन विभाग कर्मचारी दिनेश मोरे आदी उपस्थित होते.
सामाजिक पातळीवरील ठोस वनीकरण योजनेंतर्गत खंडाळा सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून येथील भैरवनाथ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नगरपंचायतीच्या एक हेक्टर गायरान क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत या क्षेत्रावर ४५ पेक्षा अधिक प्रजातीची ३० हजार झाडांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, फळे, फुले, देणाऱ्या वनस्पती, औषधी झाडे, झुडपांची लागवड करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी रस्ता, इंधन विहीर खोदणे अथवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांची विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येणार आहे, तसेच प्रकल्पाला पूर्णपणे तारेचे कुंपण व लोखंडी गेट लावून बंदिस्त राहणार असून, संपूर्ण ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी देण्यात येणार आहे.

---------------------------

कोट :

लोणंद शहराच्या पश्चिमेकडे उंच पटारावर हा प्रकल्प साकारतोय शहराच्या दृष्टीने येथे होणारा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, शहराचे नैसर्गिक सौंदर्य व वनसंपदा वाढवण्याबरोबर येथील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यास निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी नगरपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करून हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जावा, यासाठी आमचा शंभर टक्के प्रयत्न राहील.

- गणीभाई कच्छी, उपनगराध्यक्ष.

-----------------------------------

कोट

शासनाच्या निर्देशानुसार हा प्रकल्प उभारताना कसलीही तडजोड अथवा कुचराई केली जाणार नाही. मात्र, त्यासाठी नगरपंचायतीचे सहकार्य आवश्यक आहे. एक वर्षाच्या आत सावली देणारी ३० हजार झाडे लावून हा प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणून ठरावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी खडक फोडून जमिनीचे सपाटीकरण करून, खड्डे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये योग्य खत माती भरून संपूर्ण प्रकल्प तार कंपाउंडद्वारे बंदिस्त करण्यात येणार आहे. रस्ते व ठिबक सिंचन योजना राबवून उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नाही, तशी व्यवस्था केली जाणार आहे.

- अमोल भालेकर, वनक्षेत्रपाल,
खंडाळा सामाजिक वनीकरण विभाग.

------------------------------

04368
लोणंद : येथे जमिनीचे सपाटीकरण व झाडांसाठी खड्डे खोदाई कामाच्या प्रारंभप्रसंगी गणीभाई कच्छी, दत्तात्रय गायकवाड, अमोल भालेकर नगरसेवक व कर्मचारी.

----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT