रामवाडी : पुणे महानगरपालिकेने शहरातील स्वच्छता विषयक विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नगररोड येथील स्वच्छ वडगावशेरी ग्रुपच्या माध्यमातून नवीन विमानतळ रस्ता वरील सिम्बायोसिस कॉलेज मिस्टिक मूड्स सोसायटीच्या भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देणारे शून्य कचरा नियोजन प्रथम पुरस्कार देण्यात आला.
पुण्याची लोकसंख्या 40 लाख च्या आसपास झाली आहे.पुणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. या साठी पालिके कडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
भिंत चित्रकला स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना ,संस्थाना शहरातील मुख्य रस्ते, चौक, अंडरपास, उड्डाणपूल आणि इतर संबंधित ठिकाणांवरील अनेक भिंती उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्पर्धकाला २० X ६ किंवा २० X ८ फूट मापाची भिंत दिली होती.
स्वच्छ वडगावशेरी ग्रुप"च्या माध्यमातून भिंत चित्रकला स्पर्धेत पर्यावरण जागृतीसाठी कचरा वर्गीकरण या विषयी नवीन विमानतळ रस्ता वरील सिम्बायोसिस कॉलेज शेजारील मिस्टिक मूड्स सोसायटीच्या भिंतीवर जवळपास ६ दिवस न थकता भिंतीवरील चित्र पूर्ण केले आहे. या भिंती वरील चित्रास अनेक बालगोपाल तसेच तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे परीक्षण करण्याकरिता तज्ञ परीक्षकांची समिती गठीत करण्यात आली होती.परीक्षणाचे निकष हे कलात्मकता, सर्जनशीलता, जनहित संदेश मूल्य, नावीन्यपणा, रंगसंगती इत्यादी संदर्भानुसार सदर स्पर्धेचा निकाल दिला जातो. या भिंती वरील चित्रास पुणे महानगर पालिकेच्या वतीने प्रथम क्रमांक जाहीर झाल्याचे स्वच्छ वडगावशेरी ग्रुपच्या लता हिरेमठ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.